सँडविच, बर्गर, सॅलड्स आणि डिप्सची चव अनेक पटींनी वाढवणारी गोष्ट म्हणजे मेयोनीज. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अंड्यातील बलक मोठ्या प्रमाणात आवडते. बाजारात मेयोनीज मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता मेयोनीज अनेक फ्लेवर्स मध्ये येत आहेत जे खूपच चवदार आहेत. पण मेयोनीज बनवण्यासाठी अंड्यातील बलकाचा वापर केला जातो. त्यामुळे काही शाकाहारी लोक आहेत जे हे खाणे टाळतात. एग्गलेस मेयोनीजही बाजारात उपलब्ध आहे पण तुम्ही ते घरी देखील तयार करू शकता.
अंड्यातील बलक शिवाय मेयोनीज बनवणे केवळ शक्य नाही तर ते अत्यंत सोपे आणि चवदार देखील आहे. घरगुती मेयोनीजमध्ये कोणतेही प्रिजर्वेटिव्स नसतात आणि कोणते केमिकल ही नसतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या चवीनुसार त्यामध्ये फ्लेवर टाकू शकता. मेयोनीज घरीच तयार करण्यासाठी तुम्हाला काही सामान्य गोष्टींछ आवश्यकता असेल ज्या प्रत्येक स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात. जाणून घेऊया एग्गलेस मेयोनीज घरी बनवण्याची सोपी आणि झटपट रेसिपी.
1. क्रीम आणि तेल मिक्स करा: सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात क्रीम आणि तेल टाका आणि त्याला फिरवून घ्या. फिरवल्यानंतर ते एक गुळगुळीत आणि मलाईदार पोत होईपर्यंत त्याला मिक्सरमध्ये फिरवत रहा.
2. चवीसाठी ह्या गोष्टी टाका: आता साखर, मीठ, व्हिनेगर, मोहरी पावडर आणि काळी मिरी टाका. मोहरीची पूड मेयोनीजला चांगली चव आणि घट्टपणा देते. जर तुम्हाला हलकी आंबट चव आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त लिंबाचा रस त्यामध्ये टाकू शकता.
3. पुन्हा मिक्सरमध्ये टाकून फिरवा: लक्षात ठेवा की मिक्सर जास्त वेळ चालवू नका. कारण यामुळे मिश्रण पातळ होऊ शकते. हे मिश्रण घट्ट आणि मलईदार झाल्यावर त्याला मिक्सर मधून काढून घ्या तुमचे मेयोनीज तयार आहे.
फ्लेवरयुक्त मेयोनीज: जर तुम्हाला चव वाढवायची असेल तर तुम्ही लसणाची पेस्ट आणि चिली फ्लेक्स टाकू शकता. हे मयोनीज तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून ते फ्रिजरमध्ये ठेवा. हे मेयोनीज पाच ते सात दिवस तुम्ही वापरू शकता.