मुंबई : कडाक्याच्या उन्हामध्ये (Summer) दुपारच्या वेळी थंडगार आणि हेल्दी पेय पिण्याची सर्वांचीच इच्छा असते. अशावेळी आपण कैरीचे पन्ने देखील घरी करू शकता. विशेष म्हणजे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) असते. या हंगामामध्ये कैरी आपल्याला सहज बाजारामध्ये उपलब्ध मिळते. कैरीचे पेय शरीराला पाणी देते आणि उष्णतेच्या प्रभावापासून संरक्षण करण्याचे काम करते. या हंगामामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत असणे आवश्यक आहे. यामुळेच या हंगामात दररोजच्या आहारामध्ये कैरीचा समावेश असावा.
कैरीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-1 आणि बी-2, व्हिटॅमिन सी, लोह, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, कोलीन आणि पेक्टिन असे अनेक गुणधर्म आहेत, जे उष्णतेमुळे आलेला थकवा दूर करतात आणि त्वरित ऊर्जा देते. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग जाणून घेऊयात कैरीचे पन्ने कसे तयार करायचे.
चार ते पाच कैऱ्या, एक लिटर पाणी, 100 ग्रॅम साखर, साखर, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने किंवा एक ते दीड चमचा पुदिन्याची पूड, चवीनुसार काळे मीठ, भाजलेले जिरे इत्यादी साहित्य लागेल. कैरीचे पन्ने तयार करण्यासाठी प्रथम कैरी धुवून प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि थोडे पाणी घालून एक-दोन शिट्ट्या झाल्यावर उकळा. यानंतर कैरी पाण्यासोबत एका भांड्यात काढून घ्या.
पाण्यात कैरीची साले काढा आणि मधला लगदा मॅश करा. त्यानंतर त्यामध्ये साखर टाका. साखर विरघळल्यानंतर त्यात जिरेपूड, काळे मीठ आणि भाजलेले जिरे टाका, तसेच पुदिन्याची पूड टाका, पुदिन्याची पाने बारीक चिरून घ्या. यानंतर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि अशाप्रकारे आपले कैरीचे पन्ने तयार आहे.
संबंधित बातम्या :
डासांमुळे वैताग आलाय? ‘या’ घरगुती उपायांनी करा स्वत:ची सुटका
Watermelon Juice : उष्णतेवर मात करण्यासाठी कलिंगडचा ज्यूस प्या, वाचा आरोग्य फायदे!