मुंबई : शरीर निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे खूप आवश्यक आहे. जर आपण नियमित गरम पाण्याचे सेवन केले, तर आपल्याला त्यातून बरेच फायदे मिळतील. गरम पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, जर आपण गरम पाण्यात एक लिंबू मिक्स करून पिले तर त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, गरम पाणी लिंबूसह पिताना नेहमी रिकाम्या पोटी प्या. (Mix lemon in hot water and drink it every morning)
गरम पाण्यामध्ये एक लिंबू मिक्स करा आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे लिंबू पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. परंतु, लक्षात ठेवा आपण पीत असलेले पाणी गरम म्हणजेच अगदी उकळलेले असू नये, तर ते साधारण गरम म्हणजेच कोमट असावे. अशा पाण्याचे तुम्ही आरामदायक पद्धतीने सेवन करू शकता.
आपण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर आपण दररोज गरम पाण्याचे सेवन करू शकता. गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे चयापचय बळकट होते, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू मिसळून, ते पाणी प्यायल्याने आपले वजन देखील कमी होऊ शकते. दररोज गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे रक्त परिसंचरण सुरळीत होते, यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.
तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस एक रामबाण उपाय आहे. रक्त येणाऱ्या हिरड्यांवर लिंबाचा रस चोळल्यास रक्त येणे थांबते आणि यामुळे आपले दातही चांगले होण्यास मदत होते. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळतात. व गरम पाण्याने स्नान करतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Skin Care | मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Mix lemon in hot water and drink it every morning)