Weight Loss : झटपट वजन कमी करायचे आहे? मग, दररोज सकाळी खा पपई!

| Updated on: Jul 06, 2021 | 8:20 AM

पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, हे सर्वांना ठावूक आहे. पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात.

Weight Loss : झटपट वजन कमी करायचे आहे? मग, दररोज सकाळी खा पपई!
पपई
Follow us on

मुंबई : पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.  पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. परंतु, तुम्हाला हे माहिती आहे का? की, पपई खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. पपईमध्ये असलेल्या काही घटकांमुळे आपले वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे आपण दररोजच्या आहारात पपईचा समावेश केला पाहिजे. (Papaya is beneficial for weight loss)

जर आपण वजन कमी करण्यासाठी प्लान करीत असाल तर आपण पपईचे सेवन करणे आवश्यक आहे. पपईमध्ये असलेले फायबर्स तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात. पपई खाल्ल्याने पोटही पटकन भरते, म्हणून जर तुम्ही सकाळी उठून पपई खाल्ली तर तुम्हाला दिवसभर फार भूक लागणार नाही आणि आपण जास्त खाण्याचा प्रयत्न करणार नाही. विशेष म्हणजे पपई खाल्याने बराच वेळ आपले पोट भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला भूक देखील लागत नाही.

पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-ए असते. व्हिटॅमिन-एच्या सेवनाने दृष्टी वाढते. म्हणूनच, औषधे घेण्याऐवजी आपण नैसर्गिक उपायांनी सहजपणे दृष्टी वाढवू शकता, म्हणून या दिवसात नियमितपणे पपईचे सेवन करा. आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे हे खूप महत्वाचे आहे. जर रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर केवळ कोरोनाच नव्हे तर कोणताही रोग आपल्याला स्पर्श करू शकत नाही. पपई आपल्या शरीरात व्हिटॅमिन-सीची कमतरता पूर्ण करते.

पपईच्या पानांचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. पपईच्या पानांचा रस घरी तयार करण्यासाठी आपण चार ते पाच कवळी पपईची पाने घ्या आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मिक्स करा. त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या रसामध्ये पाणी थोडे जास्त टाका. यामुळे कडूपणा कमी होण्यास मदत होईल. पपईच्या पानांचा रस नेहमी ताज्या पानांचाच असला पाहिजे. एकदाच रस तयार करून ठेऊ नका.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Papaya is beneficial for weight loss)