Weight Loss Tips: वजन वाढलंय?, सडपातळ व्हायचंय?; मग ‘या’ 10 टिप्स फॉलो करा

| Updated on: Jul 28, 2021 | 9:46 AM

बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अपुरी झोप, मसालेदार खाणं... वजन वाढण्यामागची ही विविध कारणं सांगितली जातात. मात्र, रुटीनमध्ये बदल केला तर त्यावर मातही करता येते. (lose weight)

Weight Loss Tips: वजन वाढलंय?, सडपातळ व्हायचंय?; मग या 10 टिप्स फॉलो करा
Weight
Follow us on

नवी दिल्ली: बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अपुरी झोप, मसालेदार खाणं… वजन वाढण्यामागची ही विविध कारणं सांगितली जातात. मात्र, रुटीनमध्ये बदल केला तर त्यावर मातही करता येते. वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाय काही सवयीही बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात येतं. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. घरगुती उपायांपासून ते डॉक्टरांकडे जाण्यापर्यंत अनेक उपाय केले जातात. मात्र, तुम्ही खालील दहा टिप्सचं तंतोतंत पालन केलं तर तुमचं वजन तर कमी होईल, शिवाय तुम्हाला फ्रेशही वाटेल. (Reduce Weight And Belly Fat Very Quickly, follow tips)

फक्त दहा टिप्स

1. वजन कमी करण्यासाठी डायटींगची गरज नाही. तर डाएट बॅलेन्स करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आहारात प्रोटीनचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.

2. वजन कमी करायचं असेल तर तळलेले आणि भाजलेले पदार्थ आहारातून बाद करा. त्याऐवजी ग्रिल्ड पदार्थ खा.

3. त्याशिवाय तुमच्या आयुष्यातून ड्रिंक्स आणि अल्कहोलला कायमचं बाद केलं पाहिजे. आईस्क्रिमुळेही वजन वाढतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर या गोष्टी वर्ज्यच केल्या पाहिजेत.

4. सडपातळ व्हायचं असेल तुम्हाला तुमच्या डाएटमधून मिठाई, साखर आणि इतर गोड पदार्थ टाळली पाहिजेत. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5. सडपातळ व्हायचं असेल तर डाएटवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. शुगर, फॅट आणि कॅलरीयुक्त पदार्थ आहारातून बाद केले पाहिजेत. त्यामुळे वेगाने वजन कमी होतं.

6. वजन कमी करण्यासाठी ड्रायफ्रुट्समध्ये बदाम आणि अक्रोड खा. बदाममध्ये प्रोटीन असतात. त्यात फायबर असते. त्यामुळे भूख लागत नाही.

7. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. फळांचाही समावेश करा. पालेभाज्या आणि फळांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरिज कमी असतात.

8. त्याशिवाय भरपूर पाणी प्या. पाण्याचं योग्य प्रमाण शरीरात असेल तर मेटाबॉलिज्म चांगलं राहतं. त्यामुळे वेगाने वजन कमी होतं. शिवाय भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते. जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्यास भूख कमी लागते.

9. जेवण केल्यानंतर एक ग्लास गरम पाणी आवश्यक प्या. तुम्हाला हवं तर तुम्ही ग्री टी किंवा हर्बल टीही घेऊ शकता. त्यामुळे वजन कमी होण्यास मदतच होते.

10. वेगाने वजन कमी करायचं असेल तर रोज नियमितपणे योगा आणि व्यायाम करणं आवश्यक आहे. जॉगिंग, वॉक, शिड्या चढणे आदी करतानाच घरातील कामही करू शकता. त्यामुळे तुम्हाला वजनात फरक पडल्याचं दिसून येईल. (Reduce Weight And Belly Fat Very Quickly, follow tips)

 

संबंधित बातम्या:

Health Tips : स्पायसी फूड खाल्ल्याने अल्सर होतो?, किती खरं किती खोटं, वाचा!

Health Tips : ब्राऊन शुगर वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या आणि झटपट वजन कमी करा!

(Reduce Weight And Belly Fat Very Quickly, follow tips)