वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स फाॅलो करा आणि वजन कमी करा

| Updated on: Jun 12, 2021 | 7:06 AM

वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स फाॅलो करा आणि वजन कमी करा
हेल्दी आहार
Follow us on

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये व्यायाम करण्यासाठी आपण बाहेर देखील जाऊ शकत नाहीत. मात्र, योग्य आहार घेऊन सुध्दा आपण वाढलेले वजन कमी करू शकतो. (Special tips for losing weight)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. रोज हळद, लिंबू आणि मध घेतल्याने लठ्ठपणा देखील दूर होण्यास मदत होते. तसेच, त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता देखील होते. हळदीमुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी व्यवस्थित राहते.

डाळीत अनेक प्रकारचे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. नेहमीच्या डाळीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या घालून आपण त्याचे सांबार देखील बनवू शकता. हा पदार्थ आपल्या जेवणाचे पौष्टिक मूल्य वाढवेल आणि आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. डाळ भात खाणे हे पचनास सोपे आणि हलके आहे, ज्यामुळे आपली पाचन शक्ती वाढते. आठवड्यातून चार दिवस डाळ भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, ज्यामुळे तुमचे पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Special tips for losing weight)