Health Care : ‘या’ खास टिप्स फाॅलो करा आणि गोड खाण्याची सवय झटपट दूर करा!

| Updated on: Nov 13, 2021 | 10:06 AM

खूप गोड खाल्ल्याने शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज मिळतात, ज्यामुळे वजन वाढते आणि नंतर वजन कमी करणे खूप कठीण होते. ज्यांना मिठाई आवडते त्यांना मिठाईपासून दूर राहणे विशेषतः कठीण आहे. मिठाईचे व्यसन हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Health Care : या खास टिप्स फाॅलो करा आणि गोड खाण्याची सवय झटपट दूर करा!
लठ्ठपणा
Follow us on

मुंबई : आहारात साखरेचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो. जास्त वजन हे शरीरातील अनेक आजारांनाही आमंत्रण देते. त्यामुळे आहारातील साखरेचा वापर कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, काही लोकांसाठी हे खूप कठीण काम आहे.साखरेमुळे शरीरातील चरबी वाढते.

खूप गोड खाल्ल्याने शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज मिळतात, ज्यामुळे वजन वाढते आणि नंतर वजन कमी करणे खूप कठीण होते. ज्यांना गोड आवडते त्यांना मिठाईपासून दूर राहणे विशेषतः कठीण आहे. गोड खाण्याचे व्यसन हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला साखरेला पर्याय मिळेल. जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहासह इतर रोगांचा धोका वाढतो.

सवयी बदलणे आवश्यक

जुन्या सवयी सोडणे अवघड आहे. पण सवयींमध्ये काही बदल करून हळूहळू सवयी सोडता येतात. त्यामुळे मिठाई खाणाऱ्या व्यक्तीला ही सवय लगेच सोडणे कठीण होते. पण हळूहळू ही सवय बदलता येते. चहामध्ये दोन चमचे साखर मिसळून पिण्याची सवय असेल तर त्याऐवजी एक चमचा साखर वापरा. हळूहळू, तुम्हाला कमी साखरेचा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय होईल.

जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल, तेव्हा तुम्ही गोड पदार्थ खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थ निवडू शकता. साखरेऐवजी, तुम्ही गूळ, स्टीव्हिया किंवा पाम कँडीसारखे आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. या गोष्टी शरीरासाठी फायदेशीर असतात. मध, गूळ, खजूर, नारळ साखर इत्यादींचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये नैसर्गिक शर्करा असते, ज्यामुळे साखरेची लालसा कमी होते.

सुका मेवा फायदेशीर

मनुके, खजूर, अंजीर आणि प्लम यांसारखा सुक्यामेवामध्ये नैसर्गिकरित्या गोडपणा असतो. याव्यतिरिक्त ते आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. जे आपल्या शरीराचे पोषण करतील. तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या स्नॅकमध्ये या पदार्थांचा समावेश करू शकता. या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने भूक लवकर लागत नाही आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.

चव वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सफरचंद, चेरी, बेरी, केळी, द्राक्षे, डाळिंब, पीच आणि संत्री यांचा समावेश करू शकता. ही फळे आवश्यक पोषक आणि नैसर्गिक शर्करा समृध्द असतात. या गोष्टी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!