मुंबई : आपल्याकडे बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. आपल्याला कदाचित माहिती असेल की, जास्त कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्याने चरबी वाढते. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आहारात आणि आपल्या काही सवयींमध्ये बदल करावा लागेल. ज्यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.( Strictly follow these things and lose weight)
झोपण्याच्या दोन तास अगोदर जेवण करा
रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि सौम्य, पचन करणे सोपे आणि कमी कॅलरी युक्त असावे. रात्रीच्या जेवणातील जड पदार्थ आपल्याला बर्याचदा अस्वस्थ करतात आणि आपल्या झोपेत अडथळा आणू शकतात. यामुळे जठरासंबंधी समस्या देखील वाढवू शकतात. विशेष म्हणजे रात्रीचे जेवण आपण लवकर केले पाहिजे. यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि लठ्ठपणा देखील वाढत नाही. रात्री झोपण्याच्या दोन तास अगोदर आपण जेवन केले पाहिजेत.
जेवणाच्या अगोदर पाणी प्या
पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्यास सांगितले जाते. पण, ज्यालोकांना वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशांनी जेवनाच्या अगोदर शक्य आहे. तेवढे जास्त पाणी पिले पाहिजेत. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते.
चहा टाळा आणि कोमट पाणी प्या
खरोखरच आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण चहा पिणे पूर्णपणे टाळले पाहिजेत. चहाऐवजी आपण कोमट पाणी पिले तरी वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते. दररोज गरम पाण्याचे सेवन करा जेणेकरुन आपले वजनही नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी होईल. दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी गरम पाणी फायदेशीर आहे.
पौष्टिक आणि कमी कॅलरी
आपल्या आहारात बेरी, द्राक्षे, सफरचंद, खरबूज, ब्रोकोली, फुलकोबी, सोयाबीन, गाजर, बीट्स इ. समाविष्ट करा. या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या पौष्टिक असतात आणि त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण देखील कमी असते. हे आपल्याला निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. गहू, सोया, बाजरी, ज्वारी, नाचणी, मुग, आणि ब्राऊड राईसचा आहारात समावेश केला पाहिजे. या कडधान्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे याचा समावेश आपल्या आहारात केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरल्या सारखे वाटते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Lemon Benefits | लिंबाचा सुगंध मूड करेल फ्रेश, शरीरालाही होतील प्रचंड फायदे, संशोधकांचा दावा!https://t.co/gCPTFuYHZw#LEMONADE #lemon #Lemonfragrance
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
(Strictly follow these things and lose weight)