थंडीच्या दिवसात शरीर निरोगी व उबदार ठेवायचे? मग ‘या’ चहाचे करा सेवन

| Updated on: Dec 01, 2024 | 2:12 PM

तुम्हालाही चहा पिण्याचा छंद असेल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा चहाबद्दल सांगणार आहोत, ज्याला तुम्ही तुमच्या रुटीनचा भाग बनवू शकता आणि हिवाळ्यातही या चहाचा आनंद घेत शरीर निरोगी आणि उबदार ठेऊ शकता.

थंडीच्या दिवसात शरीर निरोगी व उबदार ठेवायचे? मग या चहाचे करा सेवन
चहा
Follow us on

Winter tea Benefits : नोव्हेंबर महिना सुरु होताच थंडी जाणवू लागली आहे. त्यात हिवाळाच्या दिवसात सकाळी लवकर उठण्याची एक वेगळीच मजा येते. कारण या दिवसांमध्ये घराबाहेर पडणारे धुकं आणि त्यात थंड हवा एक वेगळंच वातावरण निर्माण होते आणि आपलं मन एकदम प्रसन्न होते. त्यात जर तुम्हाला सकाळी गरमागरम चहा मिळाला तर त्याची मजा काही औरच असते.

या ऋतूमध्ये उबदार राहण्यासाठी व कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी लोकं अनेक उपाय करत असतात. ज्यामुळे अनेक आजार व इन्फेकशन होऊ नये. अशा तऱ्हेने या ऋतूत आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या आहारात काही आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही चहा पिण्याचा छंद असेल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा चहाबद्दल सांगणार आहोत, ज्याला तुम्ही तुमच्या रुटीनचा भाग बनवू शकता आणि हिवाळ्यातही या चहाचा आनंद घेत शरीर निरोगी आणि उबदार ठेऊ शकता.

मसाला चहा

मसाला चहा पिण्याचे तर अनेक लोकंही शौकीन असतात. काहीजण त्याच्या दिवसाची सुरुवात हि एक कप मसालेदार चहाने होते.कारण हा चा बनवण्यासाठी वेलची, दालचिनी, लवंग, आलं आणि कधी कधी काळी मिरी वापरली जाते, ज्यामुळे त्याची चव तर वाढतेच, शिवाय आरोग्यालाही फायदा होतो. त्यातील आले हे पचनास मदत करते, तर दालचिनी आपल्याला आतून उबदार ठेवण्यास मदत करते.

लेमन पेपर टी

तुम्ही जर हिवाळ्यातील परफेक्ट ड्रिंक शोधत असाल तर लेमन पेपर टी नक्की ट्राय करून पाहू शकता. लेमन पेपर टी हा चहा या ऋतूत खूप प्रभावी मानला जातो आणि त्याची चवही खूप आश्चर्यकारक असते. लिंबचा चटपटीत पणा आणि त्यात असणारी काळी मिरीची हलकी चव आपल्याला ताजेतवाने तर करतेच पण सर्दी किंवा फ्लूची लक्षणे दूर करण्यास ही मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.

आले आणि पुदिना चहा

हिवाळ्यात निरोगी आणि उबदार राहण्यासाठी तुम्ही आले आणि पुदिन्याचा चहा पिऊ शकता. आल्याची उष्णता आणि त्यात असलेल्या पुदिन्याचा थंडावा तुम्हाला फ्रेश ठेवतात. आले त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते, जे हिवाळ्यात होणारी सर्दी आणि घशातील खवखव दूर करण्यास मदत करते. याशिवाय यात असलेल्या पुदिन्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरावर थंड प्रभाव पडतो.

दालचिनी आणि वेलची चहा

दालचिनीची उष्णता आणि वेलचीची चव यामुळे हिवाळ्यासाठी हे एक परफेक्ट पेय आहे. दालचिनीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे कोणत्याही फ्लू किंवा संसर्गाला दूर ठेवण्यास मदत करतात आणि वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात.