Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ही स्वस्त पेय प्या, वजनही कमी करा आणि पैशांची बचतही करा!

| Updated on: Apr 14, 2022 | 3:12 PM

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लिंबा (Lemon) इतके दुसरे काहीच प्रभावी नाही. लिंबू वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता आणि शरीर तंदुरुस्त (Fit) ठेवू शकता. तसेच लिंबू पाण्यासोबत इतरही काही पेयांचा आहारामध्ये समावेश करूनही वाढलेले वजन तुम्ही कमी करू शकता.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ही स्वस्त पेय प्या, वजनही कमी करा आणि पैशांची बचतही करा!
वजन कमी करण्यासाठी खास उपाय
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी लिंबा (Lemon) इतके दुसरे काहीच प्रभावी नाही. लिंबू वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता आणि शरीर तंदुरुस्त (Fit) ठेवू शकता. तसेच लिंबू पाण्यासोबत इतरही काही पेयांचा आहारामध्ये समावेश करूनही वाढलेले वजन तुम्ही कमी करू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पेयांमुळे तुमचे वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होऊ शकते. ही पेये रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते. व्यायाम आणि काही खास पेयांचे संयोजन करून नक्कीच तुम्ही वजन कमी करू शकता.

पाणी

वजन कमी करण्यासाठी पाणी पिल्ल्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचे विविध अभ्यासातून दिसून आले आहे. हे तुमचे पोट भरलेले ठेवते आणि तुम्हाला जास्त खाण्यापासून वाचवते. यामुळे आपल्याला शक्य आहे, तितके जास्त पाणी आपण प्यायला हवे. पाणी पिल्यामुळे देखील आपले वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास नक्कीच मदत होते. विशेष म्हणजे सकाळी झोपीतून उठल्यावर आपण एक ग्लास पाणी प्यायला हवे.

ग्रीन टी

ग्रीन टी कॅटेचिन आणि कॅफिनने समृद्ध आहे. हे चयापचय मजबूत करण्यास मदत करते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॅफिन चरबी बर्न करण्यास मदत करते. इतकेच नाही तर 2005 च्या एका अभ्यासात जास्त वजन असलेल्या लोकांना तीन महिन्यांसाठी 150 मिलीग्राम कॅफीन मिसळून ग्रीन टी देण्यात आली होती. हे पेय पिल्ल्यानंतर त्यांच्या शरीराचे वजन आणि चरबीचे प्रमाण खूप कमी झाली.

ब्लॅक कॉफी

ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासही मदत करते. कॉफीमुळे तुम्हाला बऱ्याच वेळ भूकही लागत नाही. ब्लॅक कॉफी चरबी बर्न करण्यासाठी उत्तम काम करते. दोन आठवडे दिवसातून चार कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील चरबी सुमारे 4 टक्के कमी होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे पेय निवडू शकता. पण त्यात दूध आणि साखर मिसळायला मिक्स अजिबात करू नका. नाहीतर वजन वाढेल.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टारांचा सल्ला घेणे फायदेशीर)

संबंधित बातम्या :

Weight Loss : फक्त या 4 गोष्टी काटेकोरपणे पाळा, पाहा वजन कसे झटपट कमी होते!

Health Care Tips : निरोगी आयुष्य जगण्यासाठी या 3 जीवनसत्त्वांचा आहारात समावेश हवाच!