Weight Loss Tips : ‘या’ 5 टिप्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, वाचा अधिक!

| Updated on: Nov 15, 2021 | 10:34 AM

कोणाला वजन कमी करायचे नाही? आज प्रत्येकजण वाढलेल्या वजनामुळे हैराण आहे. वजन कमी करण्यासाठी विविध नवीन पद्धतींचा अवलंब केला जातो. पण काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. ही वर्षाची ती वेळ असते जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या टिप्सबद्दल खूप जागरूक असता

Weight Loss Tips : या 5 टिप्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, वाचा अधिक!
वाढलेले वजन
Follow us on

मुंबई : कोणाला वजन कमी करायचे नाही? आज प्रत्येकजण वाढलेल्या वजनामुळे हैराण आहे. वजन कमी करण्यासाठी विविध नवीन पद्धतींचा अवलंब केला जातो. पण काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. ही वर्षाची ती वेळ असते जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या टिप्सबद्दल खूप जागरूक असता. बरेचजण हिवाळ्याच्या हंगामामध्ये वजन कमी करण्यास सुरूवात करतात. आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल.

1. गोड पदार्थ खाणे बंद करा

हिवाळ्याच्या हंगामात गोड पदार्थ खाण्याची इच्छा जास्त होते. मात्र, यामुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. बरेच लोक सकाळी व्यायाम करतात आणि दिवसभर गोड पदार्थ खातात. ज्यामुळे वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होतात. यासाठी जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करा.

2. उपवास करू नका

ही एक मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही मेजवानीच्या आधी उपवास करता तेव्हा तुम्हाला खूप भूक लागते आणि जास्त प्रमाणात खाणे सुरू होते, ज्यामुळे तुमच्या शरीरावर ताण येतो. जे 20 तास उपवास करतात आणि नंतर उरलेले 4 तास पोट भरून खातात. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते..

3. नट्स

बदामापासून अक्रोड आणि काजू पर्यंत सर्व प्रकारच्या नट्समध्ये प्रथिने भरपूर असतात. सकाळी एक वाटी नट्सचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. विविध खाद्यपदार्थांमध्ये आपण बदाम, अक्रोडचा समावेश करू शकतो.

4. जिरे

जिरा हा असा एक मसाला आहे जो सामान्यतः बहुतेक पदार्थांमध्ये वापरा जातो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज रात्री एक चमचा जिरे भिजवून द्या आणि सकाळी ते पाण्यात मिसळून प्या. हे आपल्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. तुम्ही ते सूप, मसूर, करी मध्ये वापरू शकता.

5. मेथी

मेथीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमची भूक दीर्घकाळ शांत राहते आणि तुम्हाला जास्त खाण्यापासूनही रोखते. मेथी तुमच्या आहारातील चरबी आणि कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हे आपली भूक कमी करण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही टिप्स ट्राय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..