मुलांना चुकूनही टिफीनमध्ये देऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते आरोग्य

| Updated on: Nov 27, 2024 | 11:42 AM

मुलांचा जेवणाचा डबा केवळ पोट भरण्यासाठी नसतो, तर मुलांच्या शरीराच्या योग्य पोषणासाठी दुपारचे जेवण खूप महत्त्वाचे असते. मुलांच्या हट्टामुळे किंवा वेळेअभावी अनेकदा अशा गोष्टी टिफिनमध्ये पॅक केल्या जातात ज्या मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

मुलांना चुकूनही टिफीनमध्ये देऊ नका या गोष्टी, बिघडू शकते आरोग्य
Follow us on

मुलांसाठी टिफीन बनवताना प्रत्येक आईला विचार येतो की आज मुलांना डब्ब्यात नवीन काय द्यायचं. कारण मुलं बहुतेक डब्ब्यात दिलेले पदार्थ घरी आणतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला नीट पोषण मिळत नाही. रोज टिफीनसाठी अशी डिश बनवायची असते की त्यांची मुलं डब्यातील संपूर्ण पदार्थ खातील आणि जेवण परत घरी आणणार नाहीत. खरं तर टिफीन हा मुलासाठी पौष्टिक पदार्थांचा खजिना असला पाहिजे, पण कधी कधी टिफीनमध्ये मुलाच्या हट्टामुळे त्यांच्या आवडीची वस्तू पॅक करून दिली जाते. यामुळे अनेकदा अश्या पदार्थांमुळे पौष्टिक घटक मुलांच्या शरीराला मिळत नाही. म्हणजेच मुलाच्या टिफीनमध्ये अनहेल्दी फूड असलयाने त्यांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

आजकाल मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत जंक फूड खाण्याची क्रेझ आहे आणि अशा तऱ्हेने त्यांना घरगुती जेवण आवडत नाही आणि असेच पदार्थ टिफीनमध्ये पॅक करावेत अशी त्यांची इच्छा असते. मुलाच्या हट्टामुळे किंवा वेळ नसला तरी मुलांनी टिफीनमध्ये काही पदार्थ देणे पूर्णपणे टाळावे. चला तर मग जाणून घेऊया मुलांना लंच बॉक्समध्ये कोणते पदार्थ पॅक करू नयेत.

जास्त फॅट असलेले पदार्थ देऊ नये

मुलं फ्रेंच फ्राईज खाण्याचा खूप आग्रह धरतात. फ्रेंच फ्राईजमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते आणि बटाट्यामध्ये स्टार्च असतो, तसेच त्यासोबत खाल्लेले मेयोनीज आणि सॉस मुलांना आणखी अस्वास्थ्यकर बनवतात. त्यामुळे मुलांच्या टिफीनमध्ये फ्रेंच फ्राइज किंवा कोणत्याही प्रकारचे हाय फॅट जेवण देणे टाळावे.

इन्स्टंट नूडल्स देणे टाळा

वेळेअभावी मुलांच्या टिफीनमध्ये इन्स्टंट नूडल्स पॅक केले जातात. पण हे त्याच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. बहुतेक नूडल्स मैद्यापासून बनवलेले असतात आणि त्यात प्रिझर्व्हेटिव्हस घातले जातात, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, त्यामुळे चुकूनही मुलाला इन्स्टंट नूडल्स देऊ नका. त्याऐवजी मिश्र धान्याचे पीठ बारीक करून त्याचे घरगुती नूडल्स अनेक प्रकारच्या भाज्यांसह बनवून मुलांना द्यावेत.

टिफीनमध्ये गोड पदार्थ पॅक करू नका

शाळेत जाताना मुलं चॉकलेट, टॉफीचा खूप आग्रह धरतात. अशावेळी आई-वडिल मुलांना या गोष्टी घेऊन देतात.पण जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे मुलांना टिफिनबरोबर किंवा घरीही मर्यादित प्रमाणात मिठाई द्या. त्याऐवजी मुलांना जेवणासोबत टिफीनमध्ये फळे आणि नटस द्यावेत.

मैद्यापासून बनवलेले पदार्थ

चुकूनही मुलांच्या टिफिनमध्ये मॅकरोनी, पास्ता, बर्गर सारखे पदार्थ देऊ नयेत. ते मैद्यापासून बनवलेले असतात आणि मुले एकदा खाल्ल्यानंतर वारंवार आग्रह धरतात. याचा मुलाच्या आरोग्यावर दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतो.