आपल्या रोजच्या जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतो. अनेकदा जेवणात चमचमीत तसेच झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. जेवणाची चव वाढावी याकरिता त्यात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर आपण करतो. तिखटपणा, रंग आणि चव यासाठी जवळजवळ प्रत्येक पाककृतीमध्ये मसाल्यांचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या मिरचीचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन करत असाल तर त्याचे घातक परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.
हिरवी मिरची सामान्यत: सुक्या लाल मिरचीपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. परंतु जर तुम्ही चवीच्या हव्यासापोटी हिरव्या मिरच्यांचे प्रमाणापेक्षा सेवन केलं तर तुम्हाला विविध विकार होऊ शकतात.
हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, जळजळ यांसारखे समस्या उद्भवू शकतात.
दररोजच्या आहारात जर तुम्ही जास्त हिरवी मिरचीचे सेवन केल्यास तोंडातील आतील त्वचा लालसर पडते. तसेच बारीक पुरळ सुद्धा येऊन खूप वेदना होतात.
हिरव्या मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे बॅक्टेरियाविरूद्ध आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते. त्यामुळे तुमच्या शरीराला संसर्ग होण्याचा धोका संभवतो.
हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने असह्य टीबी रोग होऊ शकतो.
हिरवी मिरची खाल्ल्याने रात्रीच्या झोपेवर देखील परिणाम होतो. कारण ते आपल्या शरीरातील पेशींना उत्तेजित करते ज्यामुळे लवकर झोप येत नाही.
हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढून त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.
हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने वजन नियंत्रित करणे कठीण होऊ शकते.
जर तुम्ही हिरव्या मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भासू लागते.
रोजच्या आहारात अधिक प्रमाणात हिरवी मिरची खाल्ली तर शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे बहुतेक लोकांना वेदना, सूज आणि इतर समस्या निर्माण होतात.