मुंबई : वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु हे गंभीर आजारांचे एक महत्त्वाचे कारण देखील मानले जाते. यामुळे वजन (Weight) आपल्या BMI प्रमाणे असणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेष म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय अवघड कामांपैकी एक आहे. या खास बातमीमध्ये आपण बघणार आहोत की, या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये व्यायाम (Exercise) आणि डाएट फाॅलो करून आपले वजन कशाप्रकारे नियंत्रणात ठेवले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात लोक अशा सवयींचा समावेश रुटीनमध्ये करतात, ज्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा आणि इतर समस्या उद्भवू लागतात.
दही हे हलके अन्न म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच डॉक्टर देखील दिवसातून एकदा दही खाण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या दह्याच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर त्यात फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमचे दात आणि हाडे मजबूत होतात. यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. दही अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यामुळे वजन कमी करायचे असेल तरीही आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा नक्कीच समावेश करा.
उन्हाळा असो वा हिवाळा प्रत्येक ऋतूत दुधी भोपळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. जर तुम्हाला उन्हाळ्यात हलके काही खायचे असेल तर अशावेळी आपण आहारामध्ये दुधी भोपळाचा समावेश करू शकता. याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक या पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. असे म्हटले जाते की ते खाल्ल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा राहते. विशेष म्हणजे दुधी भोपळा हा वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
लिंबू हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे मानले जाते. त्यापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता देखील पूर्ण होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या अनेकदा लोकांना होते. अशा परिस्थितीत लिंबाच्या रसापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन करून ते काही प्रमाणात हायड्रेट ठेवू शकतात. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी-6, फोलेट आणि व्हिटॅमिन ई देखील लिंबूमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. लिंबू आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर असते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)
संबंधित बातम्या :
Health Tips : उन्हाळ्याच्या हंगामात शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!