मुंबई : जवळपास सर्वच घरांमध्ये जिऱ्याचा (Cumin) वापर केला जातो. जिरे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जिऱ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी जिरे हे एक प्रकारचे सुपरफूडच आहे. जिऱ्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म देखील असतात. पचनक्रिया (Digestion) मजबूत करण्यासाठी याचे सेवन करणे उत्तम मानले जाते. जिर्यामध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत, जे पोटात आणि यकृतामध्ये ट्यूमर होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात. जर आपण रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे (Cumin water) सेवन केले तर ते आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.
जिरे पाण्य़ामुळे आपली पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी पचनसंस्था सुरळीत असणे महत्त्वाचे असते. जिरे पाचन तंत्र बरे करू शकतात आणि दीर्घकाळ निरोगी ठेवू शकतात. सध्याच्या खराब जीवनशैलीमध्ये तर वजन वाढण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. व्यायाम करण्यासाठी वेळ नसल्यामुळे वजनाची समस्या गंभीरच होत चालली आहे. जर आपण नियमितपणे जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केले तर झटपट कमी कमी होते.
बरेच लोक चुकीच्या पद्धतीने जिऱ्याचे पाणी पितात आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. जिरे पाण्यात ठेवून ते पिणे पुरेसे नाही. त्याऐवजी रात्री जिरे भिजवून ठेवा आणि सकाळी गरम करून हे पाणी प्या, अशा प्रकारे जिरे वापरल्याने शरीरातील चरबी आपोअप बर्न होण्यास सुरूवात होते. मात्र, पाणी अतिशय गरम कधीच नसावे. नेहमीच पाणी कोमट असणे आवश्यक आहे.
बऱ्याच लोकांना असे वाटते की, जिऱ्याचे पाणी बाराही महिने पिणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, अजिबात तसे नसून उन्हाळ्याच्या हंगामात जिऱ्याचे पाणी पिणे टाळा. एप्रिल ते जून या कालावधीत जिऱ्याचे पाणी अजिबात सेवन करू नये, असे सांगितले जाते. तरीही तुम्हाला याचे सेवन करायचे असेल, तर ते कोमट प्या. मात्र, शक्यतो टाळाच.
बरेच लोक दिवसभरामध्ये सतत जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. मात्र, जिथे अति होते तिथे माती होण्याची शक्यता असते. आपल्याला वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी दिवसभर जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करण्याची अजिबात गरज नाहीये. आपण फक्त सकाळीच रिकाम्यापोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. दिवसभर अजिबात नाही.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Health care tips : उन्हात निरोगी राहण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा
Health Care Tips : रात्री उशीरा खाण्याची सवय आहे? मग या गोष्टी नक्कीच वाचा आणि वेळीच सवय बदला!