मुंबई : व्यायाम आणि डाएट (Diet) करून वजन कमी करण्याकडे अनेकांचा काैल वाढला आहे. मात्र, व्यायाम आणि डाएट करूनही वजन काही कमी होत नाहीये, अशी अनेकांची ओरड असते. त्यांची कारणेही तशीच आहेत. कारण आपल्यापैकी बरेच लोक वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी प्रयत्न तर करतात. मात्र, आपल्या जीवनशैलीमध्ये अजिबात बदल करत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे त्यांचे वजन हे सातत्याने वाढते. जर तुमचे देखील व्यायाम (Exercise) आणि डाएट करूनही वजन कमी होत नसेल तर आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. त्या फाॅलो करून तुम्ही नक्कीच वजन कमी करू शकता.
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. मात्र, हे सर्व करूनही त्यांचे वजन काही कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ताण आहे. कारण जेव्हा तुमच्या कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते तेव्हा तुमच्या पोटावरील चरबी वाढण्यास सुरूवात होते. यामुळे आपण ताण कमी घ्यायला हवा.
बरेच लोक दिवसभरामध्ये अत्यंत कमी पाणी पितात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी हे पिलेच पाहिजे. पाण्याचे चांगले सेवन केले तर तुमचे वजन कमी होते आणि पोटावरील चरबी कमी होते. त्यामुळे शक्य तितके पाणी प्या आणि वजन कमी करा.
शेवटी सर्व गोष्टी आपल्या खाण्यावरच येतात. वजन वाढण्याचे मुख्य कारण आपला आहार आहे. आजकाल लोकांचा फास्ट फूड खाण्यावर अधिक भर आहे. त्यामध्येही मसालेदार, चकमकीत आणि तेलकट पदार्थांचे अधिक सेवन केले जाते. यामुळे अनेक गंभीर प्रकारचे आजार होण्याची देखील शक्यता असते. यामुळेच वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये पाैष्टीक पदार्थांचा समावेश करा.
बदाम, अक्रोड, मनुके यासारखा सुकामेवा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासह, सफरचंद किंवा सफरचंदचा रस नाश्त्यामध्ये देखील समाविष्ट केला जाऊ शकतो. केळी आणि संत्रा देखील वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही भाजलेले मखाना, बदाम, काजू खाऊ शकता. बऱ्याच लोकांना चार वाजता काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होते, अशावेळी आपण मखान्याचा चिवडा खाऊ शकतो. मखाना वजन कमी करण्यास मदत करतो.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या)
संबंधित बातम्या :
Health : रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा आणि पाहा बदल! !
Healthy diet : निरोगी राहण्याचा एकच फंडा…संतुलित आहार घ्या आणि कॅलरीज मोजत राहा, वाचा अधिक!