Weight Loss Tips : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ रसांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Apr 07, 2022 | 8:29 AM

बदललेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होताना दिसत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे झपाट्याने वाढणारे वजन. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, वजन कमी (Weight loss) करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात, हे नक्की आहे.

Weight Loss Tips : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी या रसांचा आहारात समावेश करा!
वाढलेले वजन कमी करण्यासाठी खास पेय
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होताना दिसत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे झपाट्याने वाढणारे वजन. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, वजन कमी (Weight loss) करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात, हे नक्की आहे. त्यामध्येही पोटाची चरबी कमी करताना नाकात दम येतो. पोटाची चरबी (Belly fat) कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश करू शकता. यामुळे उष्णतेपासून आराम तर मिळेलच पण पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होईल. ही पेये तुम्हाला हायड्रेट ठेवतील. हंगामी फळे आणि भाज्यांपासून बनवलेले ज्यूस तुम्ही सेवन करू शकता. या रसांमध्ये भरपूर पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. ही पेय नेमकी कोणती याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

अननसाचा रस

अननस खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अननसामुळे आपल्या चयापचयला गती मिळते. त्यामुळे पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे अननसाचा रस आपण घरी देखील तयार करू शकतो. मात्र, नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणत्याही फळामध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असतेच. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी या रसांमध्ये साखर अजिबात टाकू नये.

संत्र्याचा रस

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि कॅलरीजचे प्रमाणही अत्यंत कमी असते. संत्र्याचा रस प्यायल्याने तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. हा रस तुम्ही घरी सहज बनवू शकता. संत्रा सोलून ब्लेंडरमध्ये टाका. रस गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस घाला. त्यात थोडे काळे मीठ टाकून त्याचे सेवन करा. मात्र, शक्यतो संत्र्याचा रसाचे दुपारीच सेवन करावे. रात्री सेवन करणे टाळाच.

काकडीचा रस

हंगाम कुठल्याही असो, काकडीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काकडीत 90 टक्के पाणी असते. त्यात भरपूर पोषक असतात. यामुळे शरीर थंड राहते. काकडीचा रस प्यायल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. अशा प्रकारे तुम्ही जास्त खाण्यापासून स्वतःला वाचवू शकता. विशेष म्हणजे जर तुम्हाला काकडीचा रस तयार करण्यासाठी वेळ नसेल तर वजन कमी करण्यासाठी आपण काकडीचे काप करूनही काकडीचे सेवन करू शकता.

कलिंगडचा रस

कलिंगड खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर कलिंगडचे जास्तीत-जास्त सेवन करायला हवे. आपण कलिंगडचा रसामध्ये लिंबू मिक्स करून पिऊ शकता. तसेच कलिंगडचा रसामध्ये साखर टाकण्याची अजिबात आवश्यक्ता नाहीये. कारण अगोदर कलिंगड गोड असते. मात्र, कलिंगडच्या रसामध्ये लिंबू मिक्स करा. कारण लिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss : रोज व्यायाम करूनही वजन कमी होत नाहीये? मग या खास टिप्स फाॅलो करा!

Healthy diet : निरोगी राहण्याचा एकच फंडा…संतुलित आहार घ्या आणि कॅलरीज मोजत राहा, वाचा अधिक!