मुंबई : दिवाळी हा सण आपल्यापैकी प्रत्येकानेच अगदी जोशात आणि जल्लोषात साजरा केला आहे. या काळात प्रत्येकानेच अगदी भरभरून मिठाई, फराळ आणि पक्वान्न खाल्ली आहेत. अर्थात यामुळे अनेकांचे वजन काहीसे वाढले देखील असेल. आता अनेक लोक या वाढलेल्या वजनामुळे चिंतीत असतील आणि वजन कमी करायचे नवे, सोपे मार्ग शोधात असतील.
प्रत्येकाच्या मनात एकदातरी वजन कमी करण्याचा विचार असतो, परंतु योग्य रणनीती आणि योग्य आहारामुळेच आपल्या शरीराचे वजन कमी करता येते. यासाठी तुमचे शरीर डिटॉक्स करणे फार महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या शरीरातील घाण निघून जाते.
आता सणांची संपत आली आहे. दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे असे म्हटल्याप्रमाणे, आम्ही सर्वांनी आमच्या मित्र आणि कुटुंबासोबत मस्त वेळ घालवला आहे. आणि आता प्रत्येकाला कामावर परतायचे आहे. सणांच्या काळात मिठाई आणि इतर स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेणे हा उत्सवाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. पण, त्यामुळे अस्वस्थ वाटणे, फुगणे, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी अशा अनेक तक्रारी येतात. इतकेच नाही तर, सणासुदीचा हंगाम अनेकांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात नेहमीच अडथळा निर्माण करतो.
तुम्हीही वजन कमी करण्याची योजना आखत असल्यास, सणानंतरचे डिटॉक्स आणि वजन कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्याची तुम्हाला खूप मदत होऊ शकते. चला तर जाणून घेऊया…
दिवाळीच्या सणात आपण सर्वांनी मिठाई आणि प्रक्रिया केलेल्या अन्नातून खूप जास्त साखर सेवन केली आहे. म्हणून, दोन आठवडे साखरयुक्त अन्न पूर्णपणे टाळण्याची वेळ आली आहे. किमान दोन आठवडे बेकरी आयटम, मिठाई, कोला, केक आणि बिस्किटांना नाहीच म्हणा!
तुमचे शरीर जलद डिटॉक्स होण्यासाठी कोमट लिंबू पाणी पिऊन तुमचा दिवस सुरू करा. हे वजन कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करेल.
दररोज किमान 8-9 ग्लास पाणी पोटात जाईल याची खात्री करा. पुरेशा द्रव पदार्थांसह हायड्रेटेड राहिल्याने शरीराला घाम आणि लघवीद्वारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल.
तुमच्या पचन संस्थेवर कमीत कमी दबाव टाकण्यासाठी आठवडाभर तुमचे जेवण हलके ठेवण्याचा प्रयत्न करा. लाल मांसाऐवजी वनस्पती-आधारित आहार निवडा, जो पचण्यास सोपा असेल.
फायबर शरीराला डिटॉक्सिफाय करण्यात खूप मदत करू शकते. काही फायबरयुक्त पदार्थ सेवन केल्याने आतड्यांच्या भिंतीवरील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होईल. काकडी, गाजर, लेट्युस, अंकुरलेले धान्य आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करू शकता.
(टीप : आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी अथवा कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Health Care : खरोखरच जेवण झाल्यानंतर चालल्याने पचन लवकर होते? वाचा संशोधन काय म्हणते!