मुंबई : जवळपास सर्वांचीच सकाळ कडक आणि चवदार चहाने (Tea) होते. विशेष म्हणजे दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी घरी आल्यावर लगेचच अनेकांना चहाचा एक घोट घेतल्याशिवाय फ्रेश झाल्यासारखे अजिबात वाट नाही. मग उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच असतो. निरोगी (Healthy) राहण्यासाठी आजकाल लोक ग्रीन, ब्लॅक टी असे विविध प्रकारचे चहा देखील घेऊ लागले आहेत. पण तुम्ही कधी व्हाईट टी (White tea) बद्दल ऐकले आहे का? हा सर्वात कमी प्रक्रिया केलेला चहा असतो. शिवाय हा चहा इतर हर्बल टी पेक्षा जास्त फायदेशीर आहे. चला तर मग या चहा बद्दल अधिक जाणून घेऊयात.
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करतात. विशेष म्हणजे ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, यामध्ये अजिबात शंका नाही. मात्र, ग्रीन टीपेक्षा व्हाईट टी वजन लवकर कमी करण्यास मदत करते. व्हाईट टी हे तुमचे चयापचय वाढवते तसेच तुमची भूक नियंत्रित करते. यामुळे वजन कमी करण्यासाठी व्हाईट टी ही ग्रीन टीपेक्षाही अधिक फायदेशीर आहे.
तज्ज्ञांच्या मते, हर्बल टी प्यायल्याने तणाव कमी होतो. तुम्हालाही चिंता किंवा नैराश्यापासून दूर राहिचे असेल तर व्हाईट टी हा आरोग्यदायी पर्याय आहे. सध्याच्या आपल्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये ताण-तणावाचे प्रमाण अधिक झाले आहे. यामुळे अनेकजण नैराश्याचे बळी ठरत आहेत. जर आपल्यालाही समस्या असेल तर आपण आपल्या आहारामध्ये व्हाईट टीचा समावेश करावा.
मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी व्हाईट टी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. टाईप-1 डायबिटीज असो किंवा टाईप-2 डायबिटीज या दोन्हीवर नियंत्रण ठेवण्यास हा चहा फायदेशीर आहे. मात्र, हा व्हाईट टी आपण दिवसातून जास्तीत-जास्त 3 कप घ्यावा. यापेक्षा अधिक घेणे टाळाच. कारण कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी धोकादायकच ठरते. हा चहा पिण्याची चांगली वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. रात्री झोपताना किंवा दुपारी उन्हाळामध्ये हा चहा पिणे टाळा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Weight Loss Tips : हीच ती योग्य वेळ वजन कमी करण्याची, अशा प्रकारे उन्हाळ्यात झटपट वजन कमी करा!
Face Mask : निर्जीव आणि निस्तेज त्वचेला टवटवीत करण्यासाठी वापरा टरबूजाचे फेस मास्क