Health Care Tips : कोणते अन्न सर्वात आरोग्यदायी? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या!

| Updated on: Mar 24, 2022 | 12:41 PM

कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड (Fast food), प्रक्रिया केलेले पदार्थ, थंड पेय, मिठाई टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वेळ वाचवण्यासाठी अनेकजण भात, भाजी, पोळी आणि डाळींऐवजी पिझ्झा (Pizza) आणि बर्गरचा वापर करतात. हे पदार्थ दिवसेंदिवस खात राहिल्यास मधुमेहासारख्या समस्या येतात.

Health Care Tips : कोणते अन्न सर्वात आरोग्यदायी? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या!
हे पदार्थ आरोग्यासाठी फायेदशीर आहेत.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड (Fast food), प्रक्रिया केलेले पदार्थ, थंड पेय, मिठाई टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वेळ वाचवण्यासाठी अनेकजण भात, भाजी, पोळी आणि डाळींऐवजी पिझ्झा (Pizza) आणि बर्गरचा वापर करतात. हे पदार्थ दिवसेंदिवस खात राहिल्यास मधुमेहासारख्या समस्या येतात. पण त्यासोबत वजनही वाढते. त्याऐवजी, रोजच्या आहारात अनेक निरोगी पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते. नियमानुसार अन्नपदार्थ खाऊ शकले तर वजन (Weight Loss) खूप लवकर कमी होते. त्यामुळे रोगाचा धोकाही कमी होईल. कडधान्य हे जगातील सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे.

कडधान्य खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर! 

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या भागात लोक जास्त काळ जगतात. तेथे ते नियमितपणे विविध प्रकारचे धान्य खातात. कडधान्यामध्ये प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि फोलेटचे प्रमाण जास्त असते. नुकत्याच न्युट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की नियमितपणे भाज्या प्रथिने खाल्ल्याने आपले हृदय निरोगी राहते. कडधान्यामुळे जळजळ कमी होते, वजन नियंत्रण आणि आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत होते.

पाहा अमेरिकन डायबिटीज असोसिएशन काय म्हणते…

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, सोयाबीन, हिरवे मूग रात्री भिजवून ठेवल्यास आणि सकाळी नाश्ता म्हणून खाल्ले तर मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका खूप कमी होऊ शकतो. मोड आलेले चने, मूग, कांदा, काकडी, टोमॅटो, लिंबू घालून चाट बनवल्यास खायलाही खूप चविष्ट लागते. त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. कडधान्य जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसची समस्या उद्भवू शकते. अशावेळी काळजी घ्या. एकाच वेळी जास्त न खाता थोडे थोडे खा. कडधान्य देखील आपले आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Cholesterol: कोलेस्टेरॉलची समस्या आहे? दररोज या पेयांचा एक घोट घ्या आणि निरोगी राहा!

World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर