मुंबई : बरेच लोक वजन कमी करण्यासाठी पांढऱ्या तांदळाचे सेवन करणे टाळतात. मात्र, यावर तज्ञांचा असा विश्वास आहे की, वजन कमी करण्यासाठी तुम्ही पांढरे तांदुळ खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी पांढरे तांदुळ मदत देखील करतात. परंतू यासाठी तुम्हाला काही टिप्स फाॅलो करणे गरजेचे आहे. या टिप्स तांदळाचे पोषक घटक वाढवण्यास मदत करतात. तसेच पोटाची चरबी कमी करतात. (White rice is extremely beneficial for weight loss)
पांढरा तांदूळ बऱ्याच काळापासून निरोगी आहाराच्या यादीबाहेर आहे. कारण त्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. मात्र, अनेक अभ्यासांमध्ये असे नोंदवले गेले आहे की, तांदूळ योग्य प्रकारे खाल्ल्याने चयापचय वाढण्यास मदत होते आणि पौष्टिक घटक वाढवण्याचे काम करते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पांढरे तांदूळ कसे वापरू शकता हे बघूयात.
पांढरा तांदूळ वजन कमी करण्यास मदत करतो
पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ञ अनेकदा वजन कमी करण्यासाठी कमी-कॅलरी आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये पांढरा तांदूळ उत्तम प्रकारे बसतो. तज्ञांच्या मते, पांढरा तांदूळ हा ग्लूटेन मुक्त आहार आहे. ज्यामध्ये चरबी कमी असते आणि ते सहज पचते.
यामुळे, चयापचय वाढते आणि जे वजन कमी करण्यास मदत होते. पांढऱ्या तांदळामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात. मात्र, पांढरे तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते. जर तुम्ही भात खाताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे वजन कमी होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
तांदळाच्या प्रमाणाकडे लक्ष द्या – जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या अन्नाच्या प्रमाणावर विशेष लक्ष द्या. नेहमी पांढरे तांदूळ कमी प्रमाणात खा आणि तांदळाबरोबर इतर कोणत्याही प्रकारच्या कार्बोहायड्रेट किंवा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करू नका.
भात तयार करण्याची पद्धत बदला – तांदूळातून जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट काढून टाकण्याचा मार्ग म्हणजे तो निरोगी पद्धतीने शिजवणे. आपण काही तास तांदूळ भिजवू शकता, उकळू शकता. तांदूळ बनवताना तूप किंवा कोणत्याही प्रकारचे तेल वापरू नका. असे केल्याने कॅलरीज वाढतील. हिरव्या भाज्या वापरा. तांदळामध्ये पोषक घटक वाढवण्यासाठी तुम्ही हिरव्या भाज्या वापरू शकता.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(White rice is extremely beneficial for weight loss)