kiwi benefits : या पाच कारणांमुळे डायबेटीसचे रुग्ण रोज किवी खाण्यास सुरुवात करतील

| Updated on: Oct 21, 2024 | 8:04 PM

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही किवीचे सेवन अवश्य करु शकता. किवीमुळे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक प्रकारे फायदा होतो. किवा खाण्याचे फायदे काय आहेत आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते किती फायदेशीर आहे जाणून घ्या.

kiwi benefits : या पाच कारणांमुळे डायबेटीसचे रुग्ण रोज किवी खाण्यास सुरुवात करतील
Follow us on

जर तुम्हाला मधुमेह झाला असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे सेवन करताना काळजी घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही किवीला तुमच्या आहारात समाविष्ट करु शकतात. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये कमी ग्लायसेमिक निर्देशांक आहे आणि यामुळे इतर अन्नपदार्थांमधून ग्लुकोज शोषण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना याचा खूप फायदा होऊ शकतो.

आहार तज्ज्ञ रितु पुरी सांगतात की, किवी हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. किवीचा GI स्कोअर सुमारे 50 आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढण्याची समस्या भेडसावत नाही. कमी GI अन्नपदार्थ रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन सी समृद्ध

किवी हे व्हिटॅमिन सीने समृद्ध असेल फळ आहे. यात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. ज्यामुळे केवळ हृदयविकारच नाही तर मज्जातंतूंनाही नुकसान होऊ शकते. व्हिटॅमिन सी मुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

उच्च फायबर

किवीमध्ये विरघळणारे फायबर आढळते. त्यामुळे किवीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे शोषण कमी होते. किवी पचनासाठी देखील फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठता आणि इतर पाचन तंत्राशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करते.

कमी कर्बोदके

फळांमध्ये कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात आढळतात. पण इतर फळांच्या तुलनेत किवीमध्ये कमी कर्बोदके असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची काळजी न करता फळांचा आस्वाद घ्यायचा असेल तर किवीचे सेवन जरुर करा.

वजन कमी करण्यास उपयुक्त

किवीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचे वजन कमी करायचे असेल किंवा ते टिकवून ठेवायचे असेल तर किवीला आपल्या आहाराचा भाग बनवा. तुमचे वजन नियंत्रित करून ते रक्तातील साखरेची पातळी कमी करतील.