मुंबई : किवी हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या काळात किवीचे सेवन केल्याने शरीर थंड राहते. किवीमध्ये बरेच पौष्टिक घटक आहेत जे आपले वजन कमी करण्यास आणि पाचक प्रणाली योग्य ठेवण्यास मदत करतात. किवी खाण्याने नेमके आपल्याला कोणते फायदे होतात आणि किवीतून नेमके कुढले पोषक घटक मिळतात हे आज आपण बघणार आहोत. (Kiwi is beneficial in increasing oxygen in the body)
किवी फळामधील पोषक घटक :
किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यातील कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. हे आरडीएबरोबरच पोषकद्रव्ये पुरवते. 100 ग्रॅम किवी फळामध्ये किती पोषक घटक असतात हे आपण बघणार आहोत.
1. कॅलरी – 61
2. चरबी – 0.5
3. सोडियम – 3 मिलीग्राम
4. कार्बोहायड्रेट – 15 ग्रॅम
5. साखर – 9 ग्रॅम
6. फायबर – 3 ग्रॅम
7. प्रथिने – 1.1 ग्रॅम
वजन कमी करण्यासाठी
किवी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. यात फायबरचे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय किवीच्या रसात अँटीऑक्सिडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी, अँटी-हायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात.
निरोगी पाचक प्रणालीसाठी
किवीचा रस पाचन तंत्रासाठी चांगला असतो. हे पोटा संबंधित समस्या दूर करते. हे पोटात बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. आपण आपल्या आहारात याचा नियमित समावेश करू शकता.
रोगप्रतिकारक शक्ती
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी तुम्ही एक किवी खाल्ली तर आरोग्यासाठी चांगले असते.
त्वचेसाठी फायदेशीर
किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.
अनेक रोगांसाठी
किवी खाल्ल्याने संधिवाताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.किवी आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असल्याच किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो.
संबंधित बातम्या :
Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!
Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
Soybean Face pack | चमकदार त्वचेसाठी वापरा सोयाबीनचा फेसपॅक, दूर होतील त्वचेच्या अनेक समस्या… https://t.co/cEkULrVSMO #Soybean | #FacePack | #BeautyTips | #FaceCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
(Kiwi is beneficial in increasing oxygen in the body)