मानवाच्या शरीरात सुमारे 70 टक्के पाणी (water) असते. आपल्या सर्वांनाच रोज पाणी पिण्याची आवश्यकता असते. शरीरातील सर्व अवयवांना (त्यांची) प्रक्रिया करण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. शरीराची सर्व कार्य (body function) योग्य रितीने चालावीत यासाठी योग्य आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे खूप महत्वाचे आहे. उष्णता आणि बदलते हवामान, ताप किंवा उलट्या-जुलाब अशा अनेक कारणांमुळे शरीरात डिहायड्रेशनचा (dehydration) त्रास होऊ शकतो. ज्यामुळे अनेक समस्या आणि गंभीर आजारांचाही सामाना करावा लागू शकतो. त्यामुळेच डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ हे निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याची शिफारस करतात.
पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचे फायदे :
शरीरात द्रव पदार्थांची पातळी नियमित राखण्यास उपयुक्त –
वेब एमडी डॉट कॉम नुसार, पचन, रक्ताभिसरण, शरीराचे योग्य तापमान राखणे, तसेच पोषक तत्वांची निर्यात करणे आणि लाळ तयार करणे अशा इतर अनेक कार्यांसाठी पाण्याची गरज असते. पिट्यूटरी ग्रंथी ही मेंदूशी संवाद साधते आणि शरीरातील द्रवपदार्थ नियंत्रित करते. शरीराच्या बहुतांश कामांसाठी पाणी अत्यावश्यक असते, त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
निरोगी त्वचेसाठी आवश्यक –
चांगल्या आणि निरोगी त्वचेसाठी पाणी हे खूप महत्वाचे आहे. पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशनमुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्वचा घट्ट, तरुण आणि सुंदर ठेवण्यासाठी पाणी पिणे हा एक नैसर्गिक उपाय आहे, ज्यामुळे त्वचेतील ओलावा कायम राहण्यास किंवा लॉक होण्यास मदत मिळते.
किडनीच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करते –
शरीरात असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम द्रव पदार्थांमुळे होते. किडनी ही वॉटर सोल्युबल वेस्ट (टाकाऊ पदार्थ) लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढते. किडनी ही शरीर स्वच्छ करण्याचे आणि शुद्धीकरण करण्याचे काम करते. किडनीचे कार्य नियमितपणे व योग्यपणे चालावे यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
पोटाच्या समस्यांवर उपाय –
पुरेसे पाणी प्यायल्याने आपले पोट निरोगी राहते आणि पचनक्रियाही योग्य राहते. पाण्यामध्ये फायबर्स असतात, त्याचे सेवन करून बद्धकोष्ठतेच्या समस्येचे निदानही करता येते.