आजच तुमच्या घरामध्ये आणून ठेवा ‘ही’ झाडं, होईल मोठा फायदा

| Updated on: Nov 16, 2024 | 4:33 PM

तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही वनस्पती लावू शकतात. ज्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होईल. नासाच्या संशोधनात असे आढळले आहे की काही घरगुती वनस्पती हवेतील विषारी पदार्थ शोषून घेऊन हवा शुद्ध करते.

आजच तुमच्या घरामध्ये आणून ठेवा ही झाडं, होईल मोठा फायदा
Follow us on

वनस्पती आपल्याला ऑक्सिजन प्रदान करून आपल्या सभोवतालचा वातावरण शुद्ध करतात. ज्यामुळे आपल्याला एकदम निवांतपणा जाणवतो. अशातच दिल्लीमध्ये थंडीचा हंगाम सुरु असून दिल्लीच्या हवेच्या वातावरणात बदल झाला आहे. या ठिकाणी हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या विषारी हवेमुळॆ अनेक आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील हवेची निकृष्ट दर्जा लक्षात घेऊन वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने शुक्रवारपासून GRAP-3 लागू केला आहे.

दिल्ली शहराच्या अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब झाली असून निर्देशांक ४०० च्या पुढे गेला आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात एअर प्युरिफायर लावणे हा एक पर्याय आहे. अशातच तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही वनस्पती लावू शकतात. ज्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होईल. नासाच्या संशोधनात असे आढळले आहे की काही घरगुती वनस्पती हवेतील विषारी पदार्थ शोषून घेऊन हवा शुद्ध करते.

हेल्थलाइनच्या मते घरामध्ये व आसपास झाडे लावल्याने हवेत किंचित सुधारणा होऊ शकते, म्हणून आम्ही तुम्हाला अशा काही वनस्पतींबद्दल सांगणारा आहोत जे काही प्रमाणात हवा शुद्ध करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.

स्पायडर प्लांट : तुम्ही तुमच्या घरामध्ये घरातील वातावरण तसेच हवा शुद्ध राहण्यासाठी स्पायडर प्लांट हि वनस्पती ठेवू शकतात. हि वनस्पती हवेतील विषारी पदार्थ शोषून घेते. यामुळे घरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होते. हे रिबन प्लांट किंवा एअर प्लांट म्हणून देखील ओळखले जाते. बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये तुम्ही ते सहज ठेवू शकता.

स्नेक प्लांट : ही वनस्पती आपल्या घरात लावल्यास हानिकारक कण फिल्टर होण्यास मदत होते. स्नेक प्लांटमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे घरातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते.

कोरफड : कोरफडीचा वापर हा त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच हवा शुद्ध करण्याचे काम करते. कोरफड ही घराच्या अंगणात लावल्याने घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते. कोरफड बेंझीन आणि फॉर्मल्डिहाइड सारख्या हानिकारक कणांना नाहीसे करून हवा शुद्ध करण्यास मदत करते.

बांबू पाम : बांबू पाम हि वनस्पती तुम्ही घरी ठेवू शकता. ही वनस्पती हवेतील बेंझीन, फॉर्मल्डिहाइड, ट्रायक्लोरो इथिलीन, झायलीन आणि टोल्यूइन सारख्या धोकादायक कणांना हवेतून काढून टाकून हवा शुद्ध करण्याचे काम करते.