मुंबई : आजच्या धकाधकीच्या जिवनात प्रत्येकाला काही ना काही व्याधी असतात. बर्याच व्याधी आपण घेत असलेल्या टेन्शनमुळे वाढलेल्या असतात. वाढता ताणतणाव आपल्या शरीरावर तसेच मानसिक स्थितीवर परिणाम करतो. अशा परिस्थितीत आपण अश्वगंधासारख्या गुणकारी वनस्पतीचा वापर करून ताणतणावातून मुक्तता मिळवू शकतो. अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे जी शरीरास आतून आणि बाहेरून बरे करण्याचे काम करते. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि पौष्टिक घटक असतात, जे शरीराच्या विकासास मदत करतात. याचे सेवन केल्यास आजार रोखण्यास मदत होते. याव्यतिरिक्त शरीरात उर्जादेखील प्राप्त होते. अश्वगंधा हा उदासीनता कमी करण्यासाठी वापरला जातो. हे आपल्याला शांत ठेवते आणि शरीरातील एंडोर्फिन बाहेर टाकते. ते सेवन केल्याने तुम्ही तणावापासून दूर राहता. (know the exact benefits of Ashwagandha, which is useful for relieving stress)
अश्वगंधा शरीरातील कोर्टिसोलच्या पातळीवर परिणाम करते. कोर्टिसोल हा एक स्ट्रेस हार्मोन आहे. हे शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते. ज्यामुळे आपण तणावापासून दूर राहता.
अश्वगंधा शरीरात स्नायूंची शक्ती वाढवण्याचे काम करते. विशेषतः वृद्धांनी ते सेवन केले पाहिजे. वजन कमी करण्याबरोबरच हे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
अश्वगंधा रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील तग धरण्याची क्षमता वाढवते. यामुळे शरीर शारीरिक आणि मानसिक पातळीवर निरोगी राहते.
अश्वगंधा शरीरात इन्सुलिनची पातळी वाढविण्याचे कार्य करते, ज्यामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेह रूग्णांसाठी अश्वगंधाचे सेवन करणे फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते.
अश्वगंधा आपल्या स्मरणशक्तीसाठी आणि मानसिक स्थितीसाठी खूप चांगले आहे. हे मेंदूला चालना देते आणि सुस्थितीत ठेवते. मेंदूची कार्यक्षमता वाढवते.
वाढता ताणतणाव बहुतेक पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करतो. ज्या पुरुषांना जास्त ताण येतो, त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी असते. अश्वगंधा तणावाची पातळी कमी करण्यात मदत करते. यातून शुक्राणूंची संख्या वाढते.
जर तुम्हाला तणाव आणि चिंतेमुळे झोप येत नसेल, तर रात्री झोपायच्या आधी एका ग्लास दुधात थोडीशी अश्वगंधा पावडर प्या. हे आपल्याला चांगली झोप लागण्यास आणि आपल्या झोपेची पद्धत सुधारण्यास मदत करेल. (know the exact benefits of Ashwagandha, which is useful for relieving stress)
वनप्लस 9 सिरीजचे नवीन स्मार्टफोन आणि वनप्लस स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यांबाबतhttps://t.co/FhoKR6E5Mm#OnePlus9Series |#smartphones |#smartwatch |#launched
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2021
संबंधित बातम्या
बदाम खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा !
रुक्ष केसांच्या समस्या आणि केस गळतीही होईल कमी, ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !