मुंबई : भवतेक लोकांची सकाळ ही चहापासून सुरू होते. मात्र, दुधापासून बनवलेल्या चहाचे अति सेवन केल्यावर त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतात. हे माहिती असूनही अनेक लोक चहाच पितात. जर तुम्हाला चहा पिण्याची सवय सोडायची असेल तर तुम्ही संत्राच्या सालाचा चहा करून पिऊ शकतात. याचे अनेक फायदे आपल्या शरीरावर होतात. विशेष म्हणजे तुम्ही संत्राच्या सालाचा चहा दररोज पिला तर तुमचे वजन देखील कमी होते. आज आम्ही तुम्हाला संत्राच्या सालापासून बनवलेल्या चहाच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. (know the properties of orange peel tea)
-संत्राच्या सालाच्या चहामुळे आपली त्वच्या सुंदर होते. हा चहा रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून देखील कार्य करतो. त्याची चवही खूप चांगली आहे. संत्राच्या सालाचा चहा बनवण्याच्या पद्धती आणि त्याचे सेवन करण्याचे फायदे खाली वाचा ..
-संत्राच्या सालाचा चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य सर्वात अगोदर एका संत्रीचे साल घ्या, दालचिनी, 2 ते 3 लवंगा आणि गूळ अर्धा चमचा त्यानंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवा आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये संत्राचे साल आणि वरील सर्व साहित्य टाका दहा मिनिट चहा उकळून द्या.
-दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा चहा पिल्याने तुमची पाचन प्रणाली चांगली होते. संत्राच्या सालमध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणर्धम आहेत.
-संत्राच्या सालाच्या चहा दररोज पिला तर कर्करोगाचा धोका देखील कमी होऊ शकतो. फारच कमी लोकांना माहित आहे की संत्राच्या सालामध्ये शक्तिशाली कर्करोग नष्ट करणारा गुणधर्म असतो, जो मानवी शरीरात कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतो.
संबंधित बातम्या :
Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!
Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?
Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!
(know the properties of orange peel tea)