हिवाळ्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी असते त्यामुळे थंडी जाणवते. शरीर उबदार ठेवण्यासाठी लोक हिवाळ्यात लोकरीचे कपडे घालतात. लोकरीचे कपडे शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. तसेच थंड वाऱ्यापासून बचाव करतात. मात्र लोकरीच्या कपड्यांची देखभाल करणे अवघड आहे. लोकरीच्या कपड्याची लोकर निघण्याची शक्यता असते. त्यासोबतच त्याचा रंग देखील जाऊ शकतो. यामुळे लोकरीचे कपडे धुताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. स्वेटर, कार्डिगन जॅकेट किंवा कोट हे कपडे लोक अनेकदा बाजारातून ड्रायक्लिन करून आणतात. पण हिवाळ्यात लोकरीचे सॉक्स धुणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण सॉक्स हे इतर कपड्यांपेक्षा लवकर खराब होतात. सॉक्स नीट न धुतल्यामुळे लोकरीचे सॉक्स लवकर खराब होतात आणि ते जास्त दिवस घालता येत नाही. गाठी येऊ शकतात त्यांचा रंग पिका होऊ शकतो. सॉक्सची इलॅस्टिक खराब होऊ शकते म्हणजेच ते सैल होऊ शकतात. यामुळे हिवाळ्यात सॉक्स धुताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे महागडे सॉक्स पुढच्या हिवाळ्यातही तुम्हाला कामी येतील.
पाण्याचे योग्य तापमान
लोकरीचे कपडे किंवा सॉक्स धुताना नेहमी पाण्याचे योग्य तापमान असणे आवश्यक आहे. लोकरीचे सॉक्स धुण्यासाठी तुम्ही थंड किंवा कोमट पाणी वापरू शकतात. गरम पाण्यामुळे लोकर तुटू शकते आणि त्याचा आकार बिघडू शकतो.
योग्य डिटर्जंट वापरा
कपडे खराब होण्यामागचे एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचे डिटर्जंट वापरणे. हलके आणि लोकरीचे सॉक्स होण्यासाठी त्याच्या फॅब्रिकशी संबंधित डिटर्जंट वापरा. कठोर डिटर्जंट पावडर वापरल्यास सॉक्सची लोकर खराब होऊ शकते. त्यामुळे सौम्य डिटर्जंट पावडर किंवा लिक्वीड वापरा.
जास्त घासू नका
सॉक्स जास्त ताणले जातात. त्यामुळे ते धुताना हलक्या हाताने धुवा जास्त जोर लावू नका. जास्त घासल्यामुळे लोकर खराब होऊन त्याची लवचिकता निघून जाते.
धुणे आणि सुकवणे
वॉशिंग मशीन मध्ये लोकरीचे सॉक्स धुवू नका. असे केल्यास सॉक्स मध्ये गाठ निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लोकरीचे सॉक्स उन्हात वाळवू नका. उन्हात सॉक्स वाळवल्यास त्याचा रंग जाऊ शकतो.