मुंबई : प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये चेहऱ्याच्या आणि केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी बरेच लोक महागड्या उत्पादनांचा देखील वापर करतात, परंतु या उत्पादनामुळे विशेष फायदा होताना दिसत नाही. चेहर्यावरची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. तर आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आपण या ‘टिप्स’चे अनुसरण करू शकता. (know these benefits of Beetroot)
-तुमच्या डोळ्याखाली काळे डाग झाले असतील तर बीटचा रस, मध आणि दूध एकत्र मिसळा आणि कापूस घ्या हे मिश्रण डोळ्यांना लावा आणि थंड पाण्याने धुवून टाका.
-बीटच्या रसात दोन चमचे दही आणि थोडेसे बदाम तेल घाला. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा आणि 10-20 मिनिटांसाठी मसाज करा.
-जर तुम्हाला वाटत असेल की, आपली त्वचा देखील गुलाबी व्हावी तर एक बीट द्या. बीट किसून द्या आणि ते बीट चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिट तसेच ठेवा आणि नंतर ते धुवा. जर आपण ही प्रक्रिया दररोज केली तर आपला चेहरा गुलाबी दिसेल.
-बीटच्या रसात साखर घाला आणि ओठांवर हे मिश्रण लावा स्क्रब करा. यामुळे ओठाची मृत त्वचा आणि गडद डाग दूर होण्यास मदत होईल.
-बीटच्या रसामध्ये मध आणि दूध टाका आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा. यामुळे आपल्या चेहर्यावरील सुरकुत्या कमी होतील.
-बीटाचा रस उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. संशोधकांना असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज एक कप बीटाचा रस पितात त्यांच्यात सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी असतो. बीटाच्या रसामध्ये नायट्रेट असते जे रक्तप्रवाह सुरळीत करते. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.
-फोलेटची कमतरता न्युरोल ट्यूब दोष आणि स्पाइना बिफिडा सारख्या आजारांना कारणीभूत ठरते. गर्भवती महिलांमध्ये फोलेटच्या कमतरतेमुळे अकाली प्रसूती होण्याचा धोका वाढतो. बीटाच्या रसामध्ये फोलेटची चांगली मात्रा आढळते
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!https://t.co/h7Jb5fvOas#food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2020
(know these benefits of Beetroot)