Skin care Tips : कोम्बुचा चहा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: May 22, 2021 | 11:40 AM

आपल्या सर्वांना निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी अनेक प्रकारची उत्पादने देखील वापरली जातात.

Skin care Tips : कोम्बुचा चहा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
वजन कमी करण्यासाठी खास पेय
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी अनेक प्रकारची उत्पादने देखील वापरली जातात. पण त्याचा काही विशेष फायदा होत नाही. जर आपण दररोज आहारात कोम्बुचा चहा घेतला तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. तसेच कोम्बुचा चहा फक्त आपल्या त्वचेसाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कोम्बुचा चहा बाजारामध्ये उपलब्ध असतो. यात प्रोबायोटिक्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. चला कोम्बुचा चहा म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊयात. (kombucha tea is beneficial for the skin)

कोम्बुचा चहा म्हणजे काय
कोम्बुचा चहा ब्लॅक आणि ग्रीन टी मिक्स करून केला जातो. या चहामध्ये प्रोबिओटिक्स, व्हिटॅमिन बी, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे नैसर्गिकरिक्ता त्वचेच्या काळजीसाठी मदत करतात. प्रोबायोटिक्स त्वचेच्या अनेक उत्पादनांमध्ये वापरले जाते. कोम्बुचा वापर क्लीन्सर, मॉइश्चरायझर आणि सीरमसारख्या सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. हे त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत करते.

त्वचा हायड्रेटेड
कोम्बुचा चहाचे सेवन पाण्यामध्ये मिक्स करून केले जाते. यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. याचा उपयोग केल्याने त्वचा ताजी राहते. काही दिवस आपण आहारामध्ये हा कोम्बुचा चहा घेतलातर आपल्या त्वचेमध्ये बदल जाणवेल.

त्वचेचा टोन सुधारतो
हा चहा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त आहे. या चहामध्ये ग्रीन आणि ब्लॅक टीचे सर्व गुणधर्म आहेत. ते पिऊन, त्वचा सुधारते आणि रंग देखील चांगला होतो. यामध्ये एंटीसेप्टिक आणि नॅचरल अॅसिडस् आहेत जे त्वचेचे पीएच संतुलित करण्यास मदत करते.

त्वचेला डिटॉक्सिफाई करते
कोम्बुचा चहामध्ये भरपूर व्हिटॅमिन बी गुणधर्म असतात. यात बी -1, बी -2, बी -6 आणि बी -12 जीवनसत्त्वे असतात. हा चहा त्वचेच्या निरोगी पेशी तयार करण्यास मदत करते. हे आपले केसही मजबूत बनवते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(kombucha tea is beneficial for the skin)