Sleeping Schedule Habit : तरुणांना सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वेड लागलं आहे. यामुळे रात्र रात्रभर अनेक तरुण मोबाईल बघत बसतात. त्याचा झोपेवर परिणाम होतो. तरुणांना झोप कमी येणे ही समस्या बनली आहे. एकतर त्यांना मुद्दाम कमी झोप लागते किंवा कामाच्या तणावामुळे त्यांना कमी झोपावे लागते. कारण काहीही असो पण ठराविक तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने अनेक बदल होतात. त्यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.
झोपताना आपल्या शरीरातील अनेक हार्मोन्स बाहेर पडतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण रोज रात्री किती तासांची झोप घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, वीस वर्षाखालील मुले दररोज फक्त पाच तासांची झोप घेतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे लोकांच्या झोपेचे तास कमी झाले आहे. याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेने लोकांना उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, कमकुवत प्रतिकारशक्ती अशा अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की झोपेच्या कमतरतेमुळे जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरलेले वाटते. यामुळे ट्रायग्लिसराईड समृद्ध लीपोप्रोटीन वाढू लागतात. ज्यामुळे शरीराच्या धमन्यांमध्ये धोकादायक फॅटी प्लेक तयार होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका हृदयाशी संबंधित आजार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.
रात्री कमी झोप घेतल्यामुळे फक्त शारीरिक नाही तर अनेक मानसिक समस्या देखील उद्भवतात कारण झोपेचा आपल्या शरीरावर तसेच आपल्या मनावर देखील विपरीत परिणाम होतो.
रात्री उशिरा पार्टी करणे.
तणावामुळे निद्रानाश.
रात्रभर कार्यालयाशी संबंधित काम करणे.
रात्रभर मोबाईलवर चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही पाहणे.
रात्री जड अन्न खाणे.
पुरेशी झोप कशी घ्याल?
झोपण्यापूर्वी संगीत ऐका किंवा पुस्तके वाचा.
ऑफिसचे काम रात्री उशिरापर्यंत करू नका.
रात्री मोबाईल टीव्ही आणि इतर कोणत्याही स्क्रीन पासून दूर रहा.
रात्री फक्त हलके अन्न खा.
झोपण्यापूर्वी दिवे मंद करा.
झोपण्याची वेळ निश्चित करा.