आर्य चाणक्य यांनी जीवनासाठीच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान पुरुष म्हणून मानले जाते. त्यांच्या जीवनकाळात त्यांनी अनेक नैतीक मूल्य सांगितली. त्या आजही उपयोगी पडतात. काळाच्या ओघात काही नैतिक मूल्य मागे पडली असली तरी इतर नैतिक मूल्य आजही जशीच्या तशी लागू होतात. यातून चाणक्य यांचं द्रष्टेपणही दिसून येतं. जर मनुष्य चाणक्यांच्या नीतीवर चालला तर त्याचं आयुष्य अत्यंत चांगलं होऊ शकतं असं सांगितलं जातं. तसेच त्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष केलं तर व्यक्तीला जीवनात अनेक संकटाना सामोरे जावं लागू शकतं. ज्यांच्या घरात लक्ष्मीचा वास नाही, त्यांच्या आयुष्यात कधीच पैसा टिकत नाही, अशा लोकांबद्दल आज आपण बोलणार आहोत. चाणक्यांनी त्यावेळी काय सांगितलं होतं याची चर्चा करणार आहोत.
जे लोक अत्यंत कटू बोलतात किंवा कठोर शब्दांचा वापर करतात त्यांच्याकडे माँ लक्ष्मी कधीच थांबत नाही. या लोकांनी आयुष्यात लाखो रुपये कमावले तरी त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. माँ लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहिली पाहिजे असं वाटत असेल तर नेहमी गोड बोला. जिभेवर नियंत्रण ठेवा. एवढेच नव्हे तर तुम्हाला खरं बोलताही आलं पाहिजे.
ज्यांना प्रमाणाबाहेर खाण्याची सवय आहे, त्यांच्याकडे कधीच पैसा टिकत नाही. अशा प्रकारे लोक आयुष्यभर पैशासाठी तरसतात. अशा लोकांकडे राहणं देवी लक्ष्मी कधीच मान्य करत नाही. खादाडांचं खाण्यावर नियंत्रण नसतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्याची गणितंही बदलतात.
जे लोकं घाणीत राहात, स्वच्छता पाळत नाहीत, अशा लोकांकडे लक्ष्मी वास करत नाही. तुमचे कपडे घाणेरडे असेल, तुम्ही आंघोळ करत नसाल, स्वत:ला, घराला स्वच्छ ठेवत नसाल तर तुमच्याकडे लक्ष्मी कधीच येणार नाही. अशा लोकांकडे पैसे कधीच टिकत नाहीत.
जे लोक सूर्योदयापासून ते सूर्यास्ता दरम्यान कधीही झोपतात अशा लोकांकडे लक्ष्मीचा वास नसतो. अशा लोकांकडे लाख प्रयत्न केला तरी पैसा राहत नाही. जे लोक वेळेत झोपतात आणि वेळेत पहाटे उठतात त्यांच्याकडे लक्ष्मीचा वास असतो. अशा लोकांची दिनचर्याही चांगली राहते. असे लोकं कोट्यधीश असूनही नेहमीच गरीब राहतात. कंगाल राहतात.