मुंबई : नवरात्रीमध्ये जर तुम्हीला काही वेगळ्या रेसिपी बनवायच्या असतील तर पनीर रोल हा एक उत्तम पर्याय असू शकतो. नवरात्रीच्या काळात अनेकांचे उपवास असतात. उपवासाच्या दिवसात जर तुम्ही तेच रटाळ पदार्थ खावून कंटाळला गेला असाल तर हा कंटाळा दूर करण्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. घर येण्याऱ्या पाहुण्यांनासुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता.
बटाटा – 2 कप
बेदाणे – 50 ग्राम
हिरवी मिरची – 4
तूप – 1 1/2 कप
पनीर – 2 कप
आवश्यकतेनुसार सैंधव मीठ
जायफळ – 1 डैश
हिरवी वेलची – 1 चिमटी
कृती
स्टेप – 1 बटाट उकडून घ्या
या स्वदिष्ट रेसिपीसाठी प्रथम बटाट उकडून घ्या.
स्टेप – 2 बटाटा आणि पनीरला एकत्र करा
एका भांड्यामध्ये पनीर आणि बारीक कापलेली हिरवी मिरची टाका. तसेच या मिश्रणामध्ये सैंधव मीठ, बेदाणे , काळी मिर्ची, वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाका. सर्व सामग्रीला चांगल्या प्रकारे मिक्स करा.
स्टेप – 3 पिठ मळून तयार करुन घ्या
एकदा सामग्री पूर्णप्रकारे मिक्स करून घ्या. तो पर्यंत उपवासाचे पिठ मळून घ्या. मळलेल्या पिठापासून छोटे छोटे रोल्स तयार करून घ्या
स्टेप – 4 रोल तळून घ्या
सर्वात शेवटी तयार केलेले रोल्स गरम कढईमध्ये तळून घ्या. हे रोल्स गोल्डन ब्राउन होई पर्यंत तळून घ्या
पनीर आरोग्यासाठी आतिशय लाभदायक असते. पनीरमध्ये पोषण तत्त्वे पोटॅशियम, सेलेनियम ,मॅग्नीशियम, फास्फोरस इत्यादी घटक असतात. हे घटक तुम्हाला मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या स्वस्थ ठेवते. पनीर शरिरीतील खूप समस्यांना दूर करते. पनीरमध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिने मोठ्याप्रमाणात असतात.
पनीर खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पनीरमध्ये पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी अनेक पोषक घटक असतात. पनीर आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते.
पनीरमध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. पनीरमध्ये कॉंज्युगेटेड लिनोलिक अॅसिड असते. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील असते. यामुळे स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी होतो.
एका वेळेत केवळ 100 ग्रॅम पनीर शरीराला पुरेसं असतं. तसेच, रात्री उशिरा पनीर खाऊ नये. पनीर नेहमी वेगवेगळ्या भाज्यासोबत मिक्स करून खावं. त्यातील प्रोटीन आणि फायबरमुळे पोट खूप वेळेसाठी भरलेलं जाणवतं. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्यात, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशियमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतं.
असली पनीर खाण्यापेक्षा बनावट पनीर नेहमीच घट्ट असते. बनावट पनीर सहज खाऊ शकत नाही, ते रबरासारखे ताणावे लागते. याशिवाय, बनावट पनीर फोडतानाही ते रबरासारखे ओढून घ्यावे लागते. याशिवाय मॅशिंगवर बनावट पनीरचा तुकडा तुटतो. कारण नकली पनीरमध्ये मिसळलेले स्किम्ड मिल्ड पावडर दाब दिल्यास तुटते. याशिवाय पनीर पाण्यात उकळा आणि नंतर थंड करा. थंड झाल्यावर, पनीरवर आयोडीन टिंचरचे 2-3 थेंब टाका. जर पनीरचा रंग निळ्या रंगात बदलला तर तो बनावट आहे हे समजून जा.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
इतर बातम्या
Hair Care | केस वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती साधे सोपे उपाय
Rose Oil Making Process | गुलाब तेलाचे भन्नाट फायदे, पण गुलाब तेल बनतं कसं ?
Health Tips : जाणून घ्या कोणत्या लोकांनी भोपळ्याच्या बिया खाऊ नयेत!