मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड, अवेळी जेवण… यांसरख्या अनेक गोष्टीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. एवढंच नाही तर, सतत बदलणाऱ्या लाईफस्टाईलमुळे अनेकांचं वजन देखील वाढतं. वजन वाढल्यामुळे अनेक जण जिमच्या दिशेने धाव घेतात. शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा तर आहेच, पण योग्य आहार घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण योग्य आहार घेत नाहीत… सध्याच्या दिवसांमध्ये डायटिंग ट्रेन्ड सुरु झाला आहे. पण डायट फॉलो करताना काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
वजन कमी करण्यासाठी सध्या लो कॅलरी डायट ही पद्धत प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र हा डायट करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हीही लो कॅलरी डायटचं पालन करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पण कोणताही आहार आणि व्यायाम करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…
लो कॅलरी डायट घेताना शरीराला पूर्ण पोषण मिळत आहे की नाही या लक्षात द्या. डायट करत असतना अचानक कॅलरीज कमी करू नका. आहारातून कॅलरीज पूर्णपणे कमी केल्याने शरीराला त्याचं नुकसान पोहोचू शकतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते.
लो कॅलरी डायट सर्वांच्या शरीरासाठी लाभदायक नसतं. म्हणून लो कॅलरी डायट फॉलो करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या… ज्यामुळे तुमच्या शरीरिला कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही. शिवाय व्यायम करताना देखील महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या.
अनेक वेळा लोकं लो कॅलरी डायटचं पालन करत असताना जेवण करणं टाळतात. पण आरोग्य तज्ज्ञ याला डायटिंगचा योग्य मार्ग मानत नाहीत. म्हणून, दिवसातून किमान 5 वेळा योग्य आहार घ्या.
लो कॅलरी डायट करताना स्वतःला हायड्रेटेड ठेवलं पाहिजं. त्यामुळे पुरेसे पाणी पिणं फार गरजेचं आहे. पुरेसं पाणी प्यायाल्यामुळे भुकेवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. म्हणून, लो कॅलरी डायट करताना शक्य तितके स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.