महाराष्ट्राची पुरणपोळी जगात भारी, महाराष्ट्रातील हे स्ट्रीट फूड नक्की करा ट्राय

| Updated on: Nov 28, 2024 | 5:20 PM

महाराष्ट्र केवळ पर्यटनासाठीच नाही तर इथल्या खाद्यपदार्थांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. इथला चटपटीत वडापाव आणि पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळते. तसेच इतर महाराष्ट्रीयन पदार्थ ही खूप चविष्ट असतात त्यातील काही लोकप्रिय स्ट्रीट फूड्स बद्दल जाणून घेऊ.

महाराष्ट्राची पुरणपोळी जगात भारी, महाराष्ट्रातील हे स्ट्रीट फूड नक्की करा ट्राय
Image Credit source: social media
Follow us on

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट संस्कृती, भेट देण्याची ठिकाणे आणि खाद्यपदार्थांसाठी ओळखल्या जाते. जेव्हा आपण महाराष्ट्रातील स्ट्रीट फूड बद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे वडापावचा. पण महाराष्ट्रामध्ये अनेक स्ट्रीट फूड्स आहे ज्याची चव अप्रतिम आहे. इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मसाले, बनवण्याची पद्धत आणि चव यांच एक अप्रतिम मिश्रण आहे. आज महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध स्ट्रीट फूड्स बद्दल जाणून घेणार आहोत ज्याची चव न घेता तुम्ही महाराष्ट्रातून गेलात तर तुमचे महाराष्ट्रात येणे निरुपयोगी ठरेल किंवा हे पदार्थ न खाता परतला तर तुमची सहल अपूर्ण समजली जाईल.

जाणून घेऊया अशाच काही स्ट्रीट फूड्स बद्दल

पावभाजी
दिल्ली सह देशातील बहुतांश भागात पावभाजी आवडीने खाल्ली जाते. मात्र त्याची खरी चव तुम्हाला महाराष्ट्रातील रस्त्यांवर चाखायला मिळेल. त्याची ग्रेवी बटाटे, टोमॅटो, मटार आणि इतर गोष्टींपासून ही पावभाजी तयार केली जाते. बटर मध्ये भाजून पाव बरोबर पावभाजी दिल्या जाते. त्यासोबत चिरलेल्या कांद्यावर, हिरवी चटणी आणि लिंबाचा आंबटपणा या पदार्थाची चव आणखीन वाढवतो. जर कधी तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर इथली पावभाजी नक्की ट्राय करा.

मिसळपाव
कोल्हापुरी मिसळ पावची रेसिपी आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. महाराष्ट्रात लोक स्नॅक्स पासून ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही मिसळ पाव खाऊ शकतात. मिसळ मोड आलेली मटकी, मसाले आणि गोड आंबट चवीसह तयार केली जाते. पाव किंवा भाकरी सोबत मिसळ खातात. मुंबई असो वा पुणे महाराष्ट्राच्या प्रत्येक गल्लीबोळात मिसळ पाव तुम्हाला नक्कीच चाखायला मिळेल.

पोहे

पोहे मध्यप्रदेशात सर्वात जास्त आवडतीचा नाश्ता असल्याचे म्हटले जात असले तरी देखील महाराष्ट्रातही पोह्याचे चाहते कमी नाहीत. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कांदे, शेंगदाणे आणि विविध मसाल्यांपासून तयार केलेले पोह्यांचे स्टॉल पाहायला मिळतील. पोह्यावर हिरवी कोथिंबीर, लिंबाचा रस आणि त्यावर बिकानेर शेव टाकून हे पोहे दिले जातात.

पुरणपोळी

पुरणपोळी महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे. जो मैदा, हरभरा डाळ, गूळ, हिरवी वेलची यासारख्या पदार्थांपासून तयार केला जातो. पुरण तयार केल्यानंतर ते पिठात भरून चविष्ट अशी चपाती तयार केली जाते. सणासुदीच्या दिवसात प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी तयार केली जाते. जर तुम्हाला महाराष्ट्रात चविष्ट नाष्टा करायचा असेल तर पुरणपोळी नक्की खा.

कोल्हापुरी मटन

जर तुम्ही मांसाहारी असाल तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी मटन नक्की खाऊन पहा. येथे कोल्हापुरी मसाले, मिरपूड, लाल मिरची आणि गरम मसाला घालून मटन ग्रेव्ही तयार केली जाते. पोळी आणि भाताबरोबर ती दिल्या जाते. ह्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही.

वडापाव

महाराष्ट्राच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा विचार केला तर वडापाव कडे दुर्लक्ष करून कसं चालेल. बेसन पीठ घालून तयार केलेल्या बटाटा पकोडा पावाच्या मधोमध ठेवून मसालेदार हिरव्या चटणी बरोबर दिला जातो. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला ही वडापाव चे वेड आहे.