मुंबई : नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. नवरात्रीच्या या उपवासादरम्यान अनेक जण तळलेले पदार्थ खातात. उपवासासाठी तुम्ही हलके फुलके पदार्थ बनवू शकता. यामध्ये कुट्टूचा हलवा ही सर्वात सोपी रेसिपी आहे. कुट्टूचा हलवा बकव्याच्या पिठापासून बनवला जातो. हा हलवा सर्व प्रकारच्या सणांमध्ये बनवता येतो. हा हलवा बनवण्याची कृती रव्याची खीर बनवण्यासारखीच आहे. यासाठी बकव्याचे पीठ शुद्ध तूपात भाजले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवतात कुट्टूचा हलवा.
बकव्याचे पीठ- 1 कप
बदामाचे पीठ – 2 टेस्पून
साखर – 1/2 कप
बदाम – 2 टीस्पून
राजगिरा पावडर – 3 टेस्पून
तूप – 5 टेस्पून
पाणी – 1 1/2 कप
हा स्वादिष्ट हलवा बनवण्यासाठी मध्यम आचेवर एक मोठी कढई ठेवा आणि त्यात पाणी उकळा.
यानंतर, मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यात 3 चमचे शुद्ध तूप टाका. वितळेल्या तूपामध्ये बकव्याचे पीठ, राजगिरा पावडर आणि बदामाचे पीठ घाला. हे सर्व मिश्रण सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
मिश्रण सोनेरी झाल्यानंतर त्यात उकडलेले पाणी घाला आणि सतत ढवळत असताना ते चांगले मिक्स करा जेणेकरून एकही गाठ शिल्लक राहणार नाही.
जेव्हा आपण पीठमध्ये पाणी टाकतो तेव्हा पीठ सर्व पाणी शोषून घेते, तेव्हा त्यातमध्ये साखर घाला आणि चांगले मिसळा. साखर हलव्याला छान गोडवा निर्माण करेल आणि त्याला छान रंग आणि सुगंध देईल.
मिश्रण चांगले शिजल्यावर गॅस बंद करा आणि वर 2 चमचे तूप घाला. कुट्टूचा हलव्यावर बदामांचे काप टाका. कुट्टूचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.
कुट्टू आटा उच्च फायबरने भरलेले असते. जे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. अधिक फायबर असल्याने उपवासाच्या दरम्यान तुम्ही कुट्टू अट्ट्याचे पदार्थ बनवून खाल्लात तर तुम्हाला जास्त भूक लागणारा नाही. तसेच तुमचं पोट भरलेले राहील. तसेच कुट्टू आटा ऐवजी तुम्ही राजगिर्याचे पीठ, सिंघड्याचे पीठ, देखील वापरू शकता.
कुट्टूचे पीठचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळताता. कुट्टूचे पीठ मधुमेहींसाठी लाभदायक असते. तसेच या पीठामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. या पीठामध्ये प्रोटीन असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी मदत होते. कुट्टूचे पीठचे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.
Health Care : कमी रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!
‘या’ चार सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला!
Health Tips : जीवनशैलीच्या या सवयी ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात, वाचा याबद्दल!