कोरोना काळात चहा सोडा, ‘हे’ पाच ड्रिंक्स घ्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

| Updated on: May 19, 2021 | 7:04 AM

कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक वेगाने सर्वत्र पसरत आहे. या काळात आपण घरी सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

कोरोना काळात चहा सोडा, हे पाच ड्रिंक्स घ्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
Follow us on

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक वेगाने सर्वत्र पसरत आहे. या काळात आपण घरी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. आपला थोडासा निष्काळजीपणा आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकत नाही. (Make these five drinks at home to boost the immune system)

आज आम्ही तुम्हाला अशा काही पेयांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. विशेष म्हणजे हे पेय तयार करण्यासाठी आपल्याला बाहेरून काही गोष्टी आणण्याची गरज देखील पडणार नाही. स्वयंपाक घरात असलेल्या वस्तूंच्या आधारे आपण ही पेय तयार करू शकतो. चला हे पेय नेमके कोणते आहेत, याबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

हळदीचा चहा
हा हळदीचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला हळद, मध आणि लिंबू लागणार आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यात उपस्थित एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. हळद 15 ते 20 मिनिटे पाण्यात उकळी येऊ द्या आणि चवीनुसार लिंबू आणि मध मिसळा.

मसाला चहा
हा मसाला चहा तयार करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरात सर्व साहित्य मिळेल. या चहामध्ये प्रतिजैविक, दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तसेच संसर्ग रोखण्यास मदत होते. मधात बॅक्टेरियाविरोधी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. एक ग्लास पाण्यात आले, लवंग, वेलची आणि तुळशीची पाने घाला आणि उकळी येऊ द्या. यानंतर त्यात मध घाला.

मध लिंबू पाणी
आपण घरच्या घरी मध लिंबू पाणी तयार करू शकतो. हे पाणी पिल्याने खोकला, ताप आणि घशातील त्रास दूर होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला दालचिनी, लसणाच्या दोन पाकळ्या, पुदिण्याचा रस, लिंबाचा रस तीन चमचे लागणार आहे. हे सर्व पाण्याच मिक्स करा आणि व्यवस्थि उकळूद्या. त्यानंतर शेवटी यामध्ये मध घाला आणि प्या.

काढा
घरगुती काढ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला आणि तापामध्ये काढा पिल्याने खूप फायदा होतो. हे श्वसन रोगांपासून मुक्त होण्यास मदत करते. काढा घरी तयार करण्यासाठी आपल्याला तुळस, लवंग, दालचिनी, आले, ओवा, हळद आणि मिरपूड लागेल. हे सर्व साहित्य मंद आचेवर चांगले उकळून घ्या आणि त्यामध्ये चवीसाठी मध किंवा गूळ घालू शकतो.

आद्रक चहा
कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आद्रक चहा अतिशय फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदात आद्रकाचे वर्णन अत्यंत उपयुक्त घटक असे आहे. आद्रक चहा तयार करण्यासाठी आपण एक ग्लास पाणी घ्यावे आणि मंद आचेवर ते उकळून घ्यावे आणि चविनुसार त्यात मध घाला.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम, लाल शिमला मिर्ची आणि मासे फायदेशीर, वाचा !

(Make these five drinks at home to boost the immune system)