Skin care : उन्हाळ्यात ‘हे’ कूलिंग फेसपॅक घरचे घरी बनवा आणि मिळवा सुंदर त्वचा !

| Updated on: May 22, 2021 | 7:16 AM

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

Skin care : उन्हाळ्यात ‘हे’ कूलिंग फेसपॅक घरचे घरी बनवा आणि मिळवा सुंदर त्वचा !
त्वचा
Follow us on

मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. असे काही फळ आहेत, ज्याचा उपयोग करून आपण घरचे घरची फेसपॅक तयार करू शकता आणि त्यामुळे आपली त्वचा देखील चांगली होईल शकते. (Make this cool facepack at home in the summer)

फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा संत्र्याच्या पावडर घ्या त्यामध्ये दही व्यवस्थितपणे मिक्स करा. ही पेस्ट साधारण 20 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा ही प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा केली तर तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. 1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

अर्धी केळी, अर्धा लिंबू प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबू पिळून घ्या. तयार मिश्रणाने बाधित त्वचेची मालिश 5 ते 7 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटांवर ठेवा. त्यानंतर ते ताजे पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ करा. आपण दररोज वापरू शकता. कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा.

दूध आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करा. 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. लिंबू आणि कलिंगडचा फेसपॅक करण्यासाठी लिंबाचा रस आणि कलिंगड मिक्स करून घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा हायड्रेट राहतो. मध आणि लिंबाचा फेसपॅक हे मिश्रण करण्यासाठी लिंबाचा रस आणि मध मिसळा.

हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. पेस्ट व्यवस्थित कोरडी झाल्यावर पाण्याने धुवा. लिंबू त्वचेत क्लींजिंग एजंट म्हणून काम करते आणि मध आपली त्वचा मॉइश्चराइझ ठेवते. दही आणि बेसन फेसमास्क उन्हाळ्यात दही आणि बेसन पीठाचा फेसपॅक लावणे खूप फायदेशीर आहे. या दोन गोष्टी समान प्रमाणात मिसळा आणि पेस्ट बनवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. यानंतर ते मिश्रण पाण्याने धुवून घ्या. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा आपल्या चेहऱ्यावर लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Make this cool facepack at home in the summer)