Beauty Tips : उन्हाळ्यात त्वचेची समस्या दूर करण्यासाठी घरी तयार करा ‘आंब्याचा फेसपॅक’

| Updated on: May 09, 2021 | 4:26 PM

आंबा जवळपास सर्वांनाच खायला आवडतो. अनेकजण आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहतात.

Beauty Tips : उन्हाळ्यात त्वचेची समस्या दूर करण्यासाठी घरी तयार करा आंब्याचा फेसपॅक
आंब्याचा फेसपॅक
Follow us on

मुंबई : आंबा जवळपास सर्वांनाच खायला आवडतो. अनेकजण आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहतात. आंबा खाण्यासाठी जेवढा चवदार आहे, त्यापेक्षाही जास्त तो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, आंबा आपल्या त्वचेसाठी देखील खूप चांगला आहे. आंबा चेहऱ्याला लावल्याने आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (Mango face pack beneficial for face)

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी
आंब्यात व्हिटॅमिन ए असते जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचे मध एक चमचे आंब्याचा रस लागणार आहे, हे सर्व एकत्र चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होईल.

टॅनिंग दूर होते
उन्हाळ्यात बहुतेक लोक टॅनिंगच्या समस्येने त्रस्त असतात. टॅनिंग काढून टाकण्यासाठी एक चमचा आंब्याचा रस, एक चमचे बेसन पीठ, दोन चमचे मध घ्या. या सर्व गोष्टी मिक्स करून पेस्ट बनवा. यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा. आपण हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकतो. याचा परिणाम एका आठवड्यात तुम्हाला दिसेल.

मुरुमाची समस्या दूर
उन्हाळ्यात त्वचा अधिक तेलकट होते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. आंबा त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी परिपूर्ण आहे. हे सामान्य त्वचेचे अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. मध, दही आणि आंब्याचा रस एकत्र करून फेसपॅक बनवा. ही पेस्ट लावल्यानंतर सुमारे 20 मिनिटाने चेहरा पाण्याने धुवा.

एक्सफोलिएट
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आंबा स्क्रब बनवा. त्यासाठी आंब्याचा रस, एक चमचे मध, एक चमचे तांदळाचे पीठ, एक चमचे दूध मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटानंतर हाताने चेहरा चोळा आणि पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

(Mango face pack beneficial for face)