खजूर खाण्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत? वाचा !

| Updated on: Mar 30, 2021 | 2:10 PM

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. मात्र, तणावाचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो.

खजूर खाण्याचे हे फायदे माहिती आहेत? वाचा !
खजूर
Follow us on

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. मात्र, तणावाचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो आणि यामुळे आपल्या मेंदूच्या क्षमतेवरही परिणाम होतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे. (Many benefits of eating dates)

-खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे हृदय चांगले राहते. साखरेचे प्रमाण कमी असणं हे देखील फायदेशीर आहे. खजूर जगभरात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे.

-आयुर्वेदानुसार, खजूर एक चमत्कारी औषध असून यामुळे अनेक रोगांवर उपाय केले जातात. शारिरीक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समय्या या सर्वांवर खजूर तुम्हाला मदत करु शकतो.

-खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो.

-आयुर्वेदानुसार, खजूर एक चमत्कारी औषध असून यामुळे अनेक रोगांवर उपाय केले जातात. शारिरीक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समय्या या सर्वांवर खजूर तुम्हाला मदत करु शकतो.

-जर तुम्ही दररोज सकाळी फक्त 2 खजूर खाल्ल्या तर त्याचा काही दिवसांत त्याच्या शरीरावर प्रचंड परिणाम होईल. खजूर खाल्लाने थकवा येत नाही.

-खजूरमध्ये आयर्नची मात्रा खूप असते. आयर्नची कमी मात्रा शरीरात त्रासाला कारणीभूत असते. ज्यामुळे छोटा श्वास, एनीमिया, दमणं अशी लक्षणं जाणवतात. रक्त स्वच्छ करण्यात देखील हे तुम्हाला मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

(Many benefits of eating dates)