हिंदू ज्योतिषीशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषानुसार शुक्र ग्रह हा सुख, समृद्धी आणि प्रेमाचं प्रतिक आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या सुखशांतीसाठी लग्नाचा वेळी कुंडलीत शुक्राची जागा पाहिली जाते. अनेक नवरा-बायकोमध्ये वाद होतात ते वाद विकोपाला जाता. अशावेळी शुक्र ग्रहाला खुश करणे गरजं असते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. काय केलं तर वैवाहिक जीवन समृद्ध, आनंदी होईल हे पाहूयात
या गोष्टी करा आणि शुक्राला खुश करा..
1. शुक्र ग्रह म्हणजे पांढऱ्या रंगाचं प्रतिक. त्यामुळे शुक्रवारी पांढऱ्या किंवा बदामी रंगाचे कपडे घाला. यासोबत शुक्रवारी पांढऱ्या गोष्टी म्हणजे तांदूळ, दूध, दही, साखर, पांढरे कपडे दान करा. ज्योतिषीनुसार असं केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता निघून जाईल.
2. ॐ शुं शुक्राय नम: आणि ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः या दोन मंत्राचा रोज सकाळी जप करा. तसंच शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी शुक्रवारी उपवास करा आणि लक्ष्मीमातेची पूजा करा. आपण कायम म्हणतो महिला हे देवीचं रुप आहे, त्यामुळे तिचा आदर करा.
3. पुजारीच्या बायकोला चांदी, तांदूळ, दूध, दही, श्वेत चंदन, पांढरे कपडे आणि मिठाई दान करा. सोबत घरी तुळशीचं रोप लावून त्याची नियमित पूजा करा.
4. सकाळी उठल्यावर स्वयंपाक घरात जेवण बनवण्यापूर्वी त्या रूमधील दक्षिण-पूर्व कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. तसंच पोळी बनविताना पहिली पोळी ही गोमाता म्हणजे गायीसाठी तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढून ठेवा. रोज असं केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल आणि घरात सुख समृद्धी येईल.
5. विशेष शुक्रवारी कोणाला इत्र देऊ नका किंवा इत्रचा वापरही टाळावा. त्याचप्रमाणे यादिवशी काळे आणि निळे कपडे घालू नका. विशेष म्हणजे साफ-सफाईकडे नियमित लक्ष द्या.
वाद सांमजस्यानं सोडवणं गरजेचं
नात्यामध्ये मतभेद होतात. ते सांमजस्याने सोडवणे गरजेचे असते. पण कधी कधी वाद खूप टोकाला जातात. अशावेळी काही कळत नाही, हे असं का घडत आहे. मग अशावेळी ज्योतिषशास्त्र आपल्याला काही उपाय सांगतं. हे उपाय करायचे की नाही हे तुमच्यावर आहे. आमचा कुठलाही दावा नाही, की हे उपाय केल्यामुळे तुमचं नातं चांगलं होईल. आम्ही फक्त इतर शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्र काय सांगतं याची माहिती दिली आहे.