Summer Skincare : उन्हाळ्यात त्वचेतील आर्द्रता टिकवण्यासाठी काय करावे?, वाचा !

| Updated on: Apr 04, 2021 | 12:41 PM

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो.

Summer Skincare : उन्हाळ्यात त्वचेतील आर्द्रता टिकवण्यासाठी काय करावे?, वाचा !
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. जर आपण उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेतली नाहीतर आपल्या त्वचेवर तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. यामुळे आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करावे लागतात. त्वचा कोरडी होऊ न देता त्वचेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. (Moisturizers and sunscreens should be applied to keep the skin hydrated and glowing)

-उन्हाळ्यात त्वचा स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे क्लींजिंग करा आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते. आपण घराबाहेर पडल्यावर घाम येतो. ज्यामुळे मुरुमांचा त्रास होतो. म्हणून, त्वचा स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे. आपण बराच वेळ बाहेर राहिल्यास चेहरा फेस वॉश किंवा पाण्याने धुवावा.

उन्हाळ्यात त्वचेचे हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझेशन ठेवण्यासाठी टोनिंग खूप महत्वाचे आहे. हायड्रेटिंग टोनरचा उपयोग त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. आपण ग्रीन टीसह घरी टोनर देखील बनवू शकता. यासाठी, आपल्याला ग्रीन टीमध्ये तेलाचे काही थेंब जोडून चेहरा मॉइश्चराइझ करावे लागेल. याशिवाय तुम्ही गुलाबाचे पाणी देखील वापरू शकता.

मॉइश्चराइझर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मॉइश्चराइझर जरी तेलकट असले तरी ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. घराच्या बाहेर कुठेही पडताना मॉइश्चराइझर लावणे गरजेचे आहे. तेलकट आणि कोरड्या अशा प्रत्येक त्वचेला मॉइश्चराइझर लावणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तर प्रत्येकाने मॉइश्चराइझर लावले पाहिजे. यामुळे आपली त्वचा चांगली राहते.

-त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज घराबाहेर पडण्यापूर्वीच सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावी असे काही नाही वर्षभर जरी सनस्क्रीन वापरली तरी त्वचेसाठी चांगली असते.

-जर तुम्हाला चमकणारी आणि निरोगी त्वचा हवी असेल तर, दररोज सकाळी लवकर जागे व्हा आणि रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्या. ही सवय आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ काढून टाकते आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक देते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या : 

(Moisturizers and sunscreens should be applied to keep the skin hydrated and glowing)