मुंबई : आपल्या जोडीदार (Partner) छाप सोडण्यासाठी जवळपास सर्वचजण फिरायला, जेवायला, सहलीवर जातात. एका सर्वेक्षणात स्कॉटलंडमधील लोकांना जगातील सर्वोत्तम लवर मानले गेले आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ब्रिटनमधील (Britain) 2,000 लोकांनी कबूल केले की रोमँटिक सुट्टीवर जाणाऱ्यांमध्ये स्कॉटिश लोक जगातील सर्वोत्तम लवर आहेत. अभ्यासानुसार, स्कॉटलंडच्या लोकांनी या बाबतीत चक्क ब्रिटिश, वेल्श आणि आयरिश लोकांना फ्रेंच आणि अमेरिकन (America) लोकांना मागे टाकले आहे. यामुळेच आता प्रत्येक मुलीला तिच्या होणारा नवरा किंवा बायफ्रेंड हा स्कॉटिश असावा अशी इच्छा नक्कीच होणार.
या सर्वेक्षणासाठी एक खास प्रश्न मंजुषा तयार करण्यात आली होती. सहभागींना 1 ते 10 च्या स्केलवर त्यांच्या सुट्टीच्या फ्लिंग्सचे रेट करण्यास सांगितले गेले होते. काही देशांनी 7 आणि 10 च्या दरम्यान स्कोअर करून टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवले. तर यामध्ये स्कॉटलंडने 43 टक्के गुण मिळवून प्रथम स्थान मिळविले. तर वेल्सने 30 टक्के गुणांसह शेवटचे स्थान पटकावले. स्कॉटलंडनंतर यामध्ये इटली 41 टक्के, तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स 38 टक्के, इंग्लंड 37 टक्के, स्पेन35 टक्के, सहाव्या स्थानावर अमेरिका 34 टक्के, पोर्तुगाल 32 टक्के, आठव्या स्थानावर आयर्लंड 31 टक्के, स्वीडन 31 टक्के आणि शेवटी 10व्या स्थानावर वेल्स 30 टक्के आहे.
41 वर्षीय डेरेक सिम्पसन या सर्वेक्षणा सांगतात की, लव्हिट कोव्हरिट नावाच्या कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणाचे आकड्यांमध्ये त्यांना काहीही विशेष वाटत नाही. कारण स्कॉटिश लोक त्यांच्या जोडीदाराला इंम्प्रेस करण्यासाठी माहिर आहेत. सर्वेक्षण करणार्या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, हॉलिडे फ्लिंग्सची संस्कृती खास फिरण्यासाठी आणि खानपानसाठी प्रसिध्द आहे. आजकतने यासंदर्भात सविस्तर रिपोर्ट दिला आहे.
Side Effects Of Ghee | आरोग्याच्या या समस्या आहेत?, तर तुपापासून चार हात दूरच राहा!
Skin | मसूर डाळीमध्ये हे घटक मिक्स करून फेसपॅक तयार करा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!