मुंबई : जगातील टॉप उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपला नातू पृथ्वीला (Prithvi) भारतातच शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांचा नातू पृथ्वीने मंगळवारी मुंबईतील (mumbai) सनफ्लॉवर स्कूलमध्ये नर्सरीला प्रवेश घेतला. पृथ्वी हा मुकेश अंबानी यांचा ज्येष्ठ पुत्र आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता यांचा मुलगा आहे. मंगळवारी पृथ्वीचा मुंबईंच्या मलबार हिल परिसरात असलेल्या सनफ्लॉवर स्कुलमध्ये नर्सरीला प्रवेश झाला. यावेळी त्याच्यासोबत आई श्लोका देखील होत्या. मंगळवारी पृथ्वी प्रथमच शाळेत गेला. शाळेत जाताना त्याचे काही फोटो देखील काढण्यात आले आहेत. पृथ्वीचे संपूर्ण शिक्षण भारतातच होणार आहे. आमची इच्छा आहे की, त्याने एका सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगावे, म्हणून त्याला आम्ही भारताच शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला एका सुरक्षीत आणि संस्कारक्षम वातावरणात शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला खात्री आहे की, आमची ही अपेक्षा केवळ भारताच पूर्ण होऊ शकते. म्हणून आम्ही त्याला मुंबईतील सनफ्लॉवर स्कूलमध्ये प्रवेश दिल्याची प्रतिक्रिया पृथ्वीची आई श्लोका यांनी दिली आहे.
दरम्यान पृथ्वीचे आई-बाबा आकाश आणि श्लोकाने देखील सनफ्लॉवर स्कूलमध्येच शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला त्याच शाळेत प्रवेश देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार मंगळवारी पृथ्वीचा केजीला प्रवेश झाला आहे. पृथ्वीने शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अंबानी कुटुंबींयांकडून एक निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निवेदनात कुटुंबीयांनी म्हटले आहे की, आज आमच्या घरातील सर्वात लहान सदस्य पृथ्वीचा शाळेत प्रवेश झाला. आम्ही पृथ्वीचे सर्व शिक्षण भारतातच करणार आहोत. त्याने सामान्य मानसासारखे आयुष्य जगावे, त्याच्यावर शिक्षणासोबतच संस्कार देखील व्हावेत म्हणून आम्ही त्याला भारतातच शिकवणार असल्येच अंबांनी कुटुंबीयांनी म्हटले आहे.
डिसेंबर महिन्यात पृथ्वीचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मुकेश अंबानी यांच्या जामनगर फार्महाऊसवर पृथ्वीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती. यामध्ये हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि झहीर खान यांचा देखील समावेश होता. त्यानंतर आता पृथ्वीला केजीसाठी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.
कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा
युद्धामुळे जगाचा बाजार कोमात, पण हा शेअर एकदम जोमात! जाणून घ्या, जगातल्या सर्वात महागड्या शेअरबद्दल