मुंबई : मोहरीच्या तेलाबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मोहरीचे तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, मोहरीचे तेल फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हिंदीमध्ये मोहरीच्या तेलाला सरसों का तेल म्हटले जाते. शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. (Mustard oil is beneficial for the skin)
मोहरी आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते. मोहरी आणि मोहरीचे तेल अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. मोहरीच्या बियांचे त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत. मोहरीतील बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करते.
बरेच लोक केसांना मोहरीचे तेल लावतात. मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे फायदे अनके आहेत. केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यास मदत होते.
मोहरीच्या तेलातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा-3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिडचा उपयोग केसांची वाढण्यासाठी होतो. याशिवाय यामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसातील कोंड्याची समस्या दूर करतात.
मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते. मोहरीच्या त्वचा ग्लोईंग करता येते. मोहरीचे तेल त्वचेस तरूण राखण्यास मदत करते. ड्राय स्किन असल्यास मोहरीच्या बीया चांगला उपाय मानला जातो.
मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असल्याने चेहऱ्यावर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यासाठी लाभदायक ठरते. मोहरीच्या तेलात तसेच बियांमध्ये कॅरोटीन आणि ल्यूटिन हे घटक असल्याने अँटी-ऑक्सिडेंट तयार करतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असल्याने हे त्वचेवर अँटी-एजिंगप्रमाणे काम करते आणि त्वचेस तारूण्या प्राप्त होते.
(टीप : उपचारांपूर्वी अथवा अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
(Mustard oil is beneficial for the skin)