त्वचेपासून ते पोटांच्या विविध आजारावर गुणकारी ‘कडुलिंब’

| Updated on: Apr 08, 2021 | 8:01 AM

कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे केवळ आपले वजन नियंत्रित करण्याचे काम करत नाहीतर बर्‍याच रोगांसाठी रामबाण उपचार देखील करते.

त्वचेपासून ते पोटांच्या विविध आजारावर गुणकारी कडुलिंब
कडुलिंब
Follow us on

मुंबई : कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे केवळ आपले वजन नियंत्रित करण्याचे काम करत नाहीतर बर्‍याच रोगांसाठी रामबाण उपचार देखील करते. असे लोक असतील ज्यांना कडुलिंबाचे नाव ऐकताच, तोंडात कडवट चव उतरते. कडुलिंबा भलेही कडू आहे, परंतु गोडपणा त्याच्या याच कडू चवीमध्ये लपलेला आहे. (Neem is beneficial for health)

कडुनिंबामध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असते, जे शरीराची कमजोरी दूर करते आणि हाडे मजबूत बनवते. त्याबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की, यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत. कडूलिंब आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय हे आपल्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास देखील प्रभावी आहे.
कडुनिंबाची फुले देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

फुलांमध्ये अनॉरेक्सिया, मळमळणे, ढेकर येणे आणि पोटातील कृमींवरील उपचारासाठी उपयुक्त मानली जातात. कडुनिंब ही कडू चवीची वनौषधी असल्याने तिची लाळ व शरीरस्त्रावांच्या पाझरण्यास मदत होते आणि चवीच्या संवेदना सक्रिय होतात. कडुनिंबामुळे दातांमधील पोकळ्या स्वच्छ करून चवींची संवेदना सुधारण्यासही मदत होते. रस बनवून तुम्ही कडुलिंबाची पाने सेवन करू शकता.

कडुलिंबाचा रस केवळ आपले वजन नियंत्रितच ठेवत नाही तर आपले रक्तही साफ करतो. यामुळे शरीरात होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.आपल्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त आहेत. आपण कडुलिंबाने केसांमधील कोंडा आणि स्काल्पच्या जळजळीवर उपचार करू शकता. त्याचा रस पिल्याने पोटातील कृमी कमी करण्यात खूप मदत होते. दातदुखी कमी करण्यासाठीही कडुलिंब फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Neem is beneficial for health)