Neem for Weight Loss | अशा प्रकारे करा ‘कडूलिंबा’चा वापर, वजन होईल कमी!

| Updated on: Mar 02, 2021 | 10:37 AM

कडुलिंबाचा रस केवळ आपले वजन नियंत्रितच ठेवत नाही तर आपले रक्तही साफ करतो. यामुळे शरीरात होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.

Neem for Weight Loss | अशा प्रकारे करा ‘कडूलिंबा’चा वापर, वजन होईल कमी!
कडुलिंब
Follow us on

मुंबई : जर आपले वजन वाढल्याने त्रास होत असेल आणि जिममध्ये तासन् तास घाम गाळल्यानंतरही आपले वजन कमी होत नसेल, तर यासाठी आपल्याला कोणताही ताण घेण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचे काही घरगुती उपचार सांगणार आहोत, त्यानंतर तुम्हाला अगदी हवे तसे शरीर मिळेल (Neem Leaves juice can burn body fat helpful for weight loss).

आज आपण कडुलिंबाबद्दल बोलत आहोत. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे केवळ आपल्या बर्‍याच रोगांवर उपचार करत नाही, तर आपले वजन नियंत्रित करण्यास देखील प्रभावी आहे. तथापि, असे लोक असतील ज्यांना कडुलिंबाचे नाव ऐकताच, तोंडात कडवट चव उतरते. कडुलिंबा भलेही कडू आहे, परंतु गोडपणा त्याच्या याच कडू चवीमध्ये लपलेला आहे.

गुणकारी कडुलिंब!

रस बनवून तुम्ही कडुलिंबाची पाने सेवन करू शकता. कडुलिंबाचा रस केवळ आपले वजन नियंत्रितच ठेवत नाही तर आपले रक्तही साफ करतो. यामुळे शरीरात होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.

कडुनिंबामध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असते, जे शरीराची कमजोरी दूर करते आणि हाडे मजबूत बनवते. त्याबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की, यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत. कडूलिंब आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय हे आपल्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास देखील प्रभावी आहे.

चला तर, जाणून घेऊया आपण या कडुलिंबाच्या पानांचा रस कसा तयार करू शकता आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो?( Neem Leaves juice can burn body fat helpful for weight loss)

कडुलिंबाचा रस तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य :

कडुलिंबाचा रस तयार करण्यासाठी आपल्याला एक किलो कडुलिंबाची पाने, 5 लिटर पाणी आणि एक मिक्सरची आवश्यकता असेल.

कडुलिंबाचा रस बनवण्याची पद्धत

कडुलिंबाचा रस तयार करण्यासाठी प्रथम कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळा. रात्रभर त्यांना भिजत ठेवा. सकाळी, ही पाने बारीक करून व्यवस्थित वाटून घ्या. हे मिश्रण नंतर गळून घ्या. आता, आपण दररोज त्याचा वापर करू शकता. जर आपल्याला हवे असल्यास, आपण हा रस रोज ताजा बनवू शकता किंवा एकदाच बनवून आठवडाभर पिऊ शकता.

कडुलिंबाच्या रसाचे फायदे :

– आपल्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त आहेत.

– आपण कडुलिंबाने केसांमधील कोंडा आणि स्काल्पच्या जळजळीवर उपचार करू शकता.

– त्याचा रस पिल्याने पोटातील कृमी कमी करण्यात खूप मदत होते.

– दातदुखी कमी करण्यासाठीही कडुलिंब फायदेशीर आहे.

– कडुलिंबाचे सेवन केल्याने रक्त साफ होते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Neem Leaves juice can burn body fat helpful for weight loss)

हेही वाचा :

Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा!

Amla Benefits | रोग प्रतिकारशक्त आणि हाडे मजबूत करण्यासाठी लाभदायी ‘आवळा’, अशाप्रकारे करा सेवन!