उशीचे कव्हर अन् बेडशीट बदलायला तुम्ही कंटाळा करताय? तर पडू शकते महागात, कारण…

| Updated on: Mar 22, 2025 | 5:41 PM

उशाचे कव्हर किती वेळा बदलावे (How often to change pillowcase) आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. चला बघूया आठवड्यातून कितीदा उशाचे कव्हर बदलायला हवेत?

उशीचे कव्हर अन् बेडशीट बदलायला तुम्ही कंटाळा करताय? तर पडू शकते महागात, कारण...
pillo case
Follow us on

आपलं घर नीट नेटकं आणि साफ ठेवायला सर्वांनाच आवडतं. पण तुमच्यापैकी काही जण असेही असतील जे संपूर्ण घर साफ करतात पण बेडशीट आणि उशांचे कव्हर बदलण्यास मात्र कंटाळा करतात. काही जण जोपर्यंत बेडशीट आणि उशांचे कव्हर पूर्णपणे खराब होत नाही, त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत ते बदलत नाहीत. परंतु तुम्हाला माहित आहे का की उशांचे कव्हर नियमितपणे न बदलल्याने अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात? मळकट आणि खराब उशांच्या कव्हरमुळे त्वचेची अ‍ॅलर्जी, केस गळणे, मुरुमे आणि अगदी श्वास घेण्याचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो.

खराब उशाचे कव्हर का पडू शकते महागात?

बेडशीट्स, उशाचे कव्हर जरी स्वच्छ दिसत असले तरी त्यावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, धूळ असते. जर तुम्ही ते दररोज धुतले नाही किंवा बदलले नाही तर त्याचा तुमच्या त्वचेवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

  • त्वचेची समस्या:

मळलेल्या आणि खराब झालेल्या उशीच्या कव्हरमुळे चेहऱ्यावर मुरुमे, पुरळ येण्याची शक्यता असते.

  • केसांची समस्या:

मळलेल्या उशीवर डोकं ठेवल्याने धूळ आणि बॅक्टेरियामुळे केस गळू शकतात. यासह कोंडा देखील वाढू शकतो.

  • अ‍ॅलर्जी आणि श्वासोच्छवासाची समस्या:

मळलेल्या आणि खराब उशीच्या कव्हरवरील धूळ, माती आणि बॅक्टेरियामुळे अ‍ॅलर्जी, खोकला आणि दमा सारखे आजार होऊ शकतात.

उशांचे कव्हर किती वेळा बदलावे?

दर २ ते ३ दिवसांतून एकदा तरी उशांचे कव्हर बदलले गेले पाहिजे. जर तुम्हाला त्वचेची अ‍ॅलर्जी, मुरुमे किंवा श्वास घेण्याच्या समस्या जाणवत असेल तर ते दररोज बदलणं गरजेचं आहे. यासह धुतल्यानंतर ते पूर्णपणे वाळवणे देखील तितकंच महत्वाचे आहे.

असे करा उशांचे कव्हर स्वच्छ

  • गरम पाण्याने धुवा:

उशांच्या कव्हरवरील बॅक्टेरिया आणि धूळ घालवण्यासाठी ते गरम पाण्यात धुतल्यास उत्तम ठरेल

  • माइल्ड डिटर्जंटचा वापर करा:

हार्श केमिकल असलेले डिटर्जंट त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, म्हणून माइल्ड डिटर्जंटचा वापर करा

  • उशांचे कव्हर उन्हात वाळवा:

उशाचे कव्हर उन्हात वाळवल्याने त्यात असलेले बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट होण्यास मदत होते. तसंच त्याचा कुबट वास देखील येणार नाही.

  • सिल्क किंवा कॉटनचे कव्हर शक्यतो वापरा:

सिल्क किंवा कॉटनचे कव्हर वापरल्याने त्यावर बॅक्टेरियाची वाढ कमी होते आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.