मुंबई- नवं वर्ष उजाडण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षाचा पहिला दिवस संस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येक जण तयारीला लागला आहे. नव वर्षासोबत मनाशी खूणगाठ बांधलेला संकल्पही जन्माला जातो. नवीन संकल्प उराशी बाळगून प्रत्येकजण पूर्ण करण्यासाठी झटतो. नुकत्याच बाळांला जन्म दिलेल्या तसेच मातृसुख पहिल्यांदाच अनुभवलेल्या आईंनी संकल्प करायला हवा. नव वर्ष आनंदासोबत आरोग्यदायी ठरण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल. पहिल्या दिवसापून नेमके कोणते संकल्प करायचे जाणून घ्या-
1.पुरेशी झोप
मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप महत्वाची ठरते. तुमचे बाळ झोपल्यानंतरच तुम्हाला झोप घेता येणे शक्य ठरणार आहे. झोपण्याच्या वेळेपूर्वी दोन तास पुरेशी तयारी करा. खोलीची लाईट बंद करा. मोबाईल स्वतःच्या पासून दूर अंतरावर ठेवा. तुम्ही बाळाला झोपी लावून स्वतः झोपण्याचा प्रयत्न करा.
2. नात्यांची जपवणूक
बाळाच्या वाढीसोबत नात्यांच्या दृढतेसाठी देखील काम करायला हवं. सांभाळ करतानच गुणवत्तापूर्ण वेळ मुलासोबत नक्कीच घालवायला हवा.
3.स्वतःची काळजी
बाळाच्या आणि परिवारासोबत स्वतःची काळजी करा. तुम्ही स्वतः वर प्रेम करायला सुरुवात केल्यानंतरच हे शक्य ठरणार आहे. नवा वर्षाचा नवा संकल्पाच्या विचारात असल्यास हा नक्कीच अंमलात आणा.
4.पतीवर प्रेम
मुलांच्या जम्नानंतर पती-पत्नीचे अंतर वाढते. मुलाची काळजी व नाते सांभाळण्यातच अधिक वेळ निघून जातो. जबाबदारी वाढल्यामुळे दोघांना एकमेकांना पुरेशा वेळ देता येत नाही. त्यामुळे वेळ देण्याचा संकल्प निश्चित होऊ शकतो
5. मित्रांचे कनेक्शन
आई बनल्यानंतर मुलाभोवतीच नवं जग तयार होतं.सार्वजनिक जीवनातील सक्रियता मोठ्या प्रमाणावर घटते. काही महिलांना प्रसृतीपश्चात नैराश्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मित्र व निकटवर्तीयांशी कनेक्ट असणं अत्यंत महत्वाच आहे. नव्या वर्षाच्या नव्या संकल्पात याचा समावेश हमखास हवाच!
इतर बातम्या :