रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवाराची चर्चा माध्यमांमध्ये सुरु असते. अनेक वेळा त्यांचा महाग खर्चांची चर्चा होते. नुकतीच अनंत अंबानी यांचे लग्न झाले होते. त्या लग्नात जगभराती दिग्गज आले होते. त्या लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुणांची अंबानी परिवाराने काळजी घेतली होती. त्यांच्या सर्व गोष्टींचा विचार केला होता. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी त्यांच्या ड्रेसिंगवर विशेष लक्ष दिले होते. त्यांनी परिधान केलेले कपडे आणि ज्वेलरीची चर्चा झाली होती. नीता अंबानी यांचे फॅशन डिझायनर कोण आहेत? हे तुम्हाला माहीत आहे का?
नीता अंबानी यांच्या फॅशन डिझायनर अनीता डोंगरे आहेत. त्या आता जग प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. त्या एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. बॉलीवूडमधील अनेक सेलीब्रेटी त्यांचे क्लायंट आहे. त्यात प्रियंका चोपडा अन् आलिया भट्ट यांचाही समावेश आहे.
अनीता डोंगरे यांनी आपल्या फॅशन डिझायनच्या कारकिर्दीची सुरुवात शून्यातून केली. त्यांनी जेव्हा काम सुरु केले तेव्हा त्यांच्याकडे केवळ दोन मशीन होत्या. आता जगभरात त्यांचे 270 पेक्षा जास्त स्टोअर आहेत. 61 वर्षीय अनीता यांनी कपडे शिवण्याची धडे त्यांच्या आईकडून घेतले. त्यांची आई कपडे शिवण्याचे काम करत होत्या. त्यामुळे लहाणपणीच अनीता यांना त्यासंदर्भात आवड निर्माण झाली. मोठ्या झाल्यावर त्यांनी आपले करियर करुन घेतले.
अनीता यांनी 1995 मध्ये आपल्या बहिणीसोबत वेस्टर्न कपडे शिवण्यास सुरुवात केली. आपला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी वडिलांकडून पैसे उधार घेतले. मग त्यांनी शिवलेले कपडे स्थानिक दुकानदारांना विकले. त्यानंतर त्यांना अनेक मॉल आणि स्थानिक ब्रँडकडून संपर्क साधण्यात आला. त्यांच्या यशाला झालेली ही सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही. त्यांनी AND नावाने स्वत:चा ब्रँण्ड सुरु केला.
अनीता डोंगरे यांच्या ब्रँड जगभरात चांगलाच वाढत गेला. काही मीडिया रिपोर्टनुसार, अनीता डोंगरे यांचा रेव्हेन्यू एक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. फोर्ब्सने त्यांना सर्वात श्रीमंत फॅशन डिजायनर म्हटले आहे. फोर्ब्सनुसार अनीता यांची संपत्ती 10 मिलियन डॉलर ( जवळजवळ 84 कोटी रुपये) आहे.